अन् २८ दिवसांसाठी ‘डाॅन’ येणार तुरुंगाबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 07:25 AM2023-09-27T07:25:24+5:302023-09-27T07:25:56+5:30
यावेळीही रजा नाकारता येणार नाही, असेदेखील त्याने सांगितले.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा (फर्लाे) मंजूर केली. न्यायमूर्ती नितीन सांबरे व वाल्मीकी मेनेझेस यांनी हा निर्णय दिला.
गवळीने संचित रजेसाठी सुरुवातीला कारागृह उपमहानिरीक्षकांकडे अर्ज सादर केला होता. परंतु कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण देत तो अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कारागृह उपमहानिरीक्षकांचा निर्णय अवैध असल्याचे त्याचे म्हणणे होते. यापूर्वी रजेवर सुटल्यानंतर कायदे व नियमांचे काटेकोर पालन केले. परिणामी, यावेळीही रजा नाकारता येणार नाही, असेदेखील त्याने सांगितले.
जन्मठेपेची शिक्षा
गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.