अन् चिमुकलीच्या हृदयाचे छिद्र केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 10:32 PM2019-05-04T22:32:42+5:302019-05-04T22:35:09+5:30

पाच महिन्याच्या बाळाचे वजन केवळ ३.५ किलोग्रॅम होते. यातच हृदयाच्या दोन कप्प्यामधील पडद्यावर ११ मिलिमीटरपर्यंत छिद्र होते. अशा रुग्णांमध्ये दोन किंवा तीन स्टेजमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते. बाळाचे वजन पाहता ही शस्त्रक्रिया त्याच्यासाठी धोकादायक होती. म्हणूनच पहिल्याच टप्प्यातच शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ‘इन्ट्रा ऑपरेटीव्ह ट्रान्ससोफेजल इकोकार्डिओग्राफी’ची (टीईई) मदत घेण्यात आली, आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाली. कमी वजनाच्या बाळांमध्ये पहिल्यांदाच वापरण्यात आलेली ही उपचार पद्धती आहे, असा दावा प्रसिद्ध बाल हृदय शल्यचिकित्सक डॉ. संदीप खानझोडे यांनी पत्रपरिषदेत केला.

And the heart hole of the baby made closed | अन् चिमुकलीच्या हृदयाचे छिद्र केले बंद

पत्रपरिषदेत माहिती देताना डॉ. संदीप खानझोडे, सोबत डॉ. आर.जी. चांडक, डॉ. विनय कुलकणी, डॉ. श्रीकांत बोबडे व डॉ. प्रमोद आंबटकर.

googlenewsNext
ठळक मुद्देकमी वजनाच्या बाळावर पहिल्यांदाच ‘टीईई’द्वारे शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच महिन्याच्या बाळाचे वजन केवळ ३.५ किलोग्रॅम होते. यातच हृदयाच्या दोन कप्प्यामधील पडद्यावर ११ मिलिमीटरपर्यंत छिद्र होते. अशा रुग्णांमध्ये दोन किंवा तीन स्टेजमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते. बाळाचे वजन पाहता ही शस्त्रक्रिया त्याच्यासाठी धोकादायक होती. म्हणूनच पहिल्याच टप्प्यातच शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ‘इन्ट्रा ऑपरेटीव्ह ट्रान्ससोफेजल इकोकार्डिओग्राफी’ची (टीईई) मदत घेण्यात आली, आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाली. कमी वजनाच्या बाळांमध्ये पहिल्यांदाच वापरण्यात आलेली ही उपचार पद्धती आहे, असा दावा प्रसिद्ध बाल हृदय शल्यचिकित्सक डॉ. संदीप खानझोडे यांनी पत्रपरिषदेत केला. या प्रसंगी सेंट्रल हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र चांडक, डॉ. प्रमोद आंबटकर, डॉ. विनय कुलकर्णी व डॉ. श्रीकांत बोबडे उपस्थित होते.
हिंगणा रोडवरील आस्था दुबे ही चिमुकली पाच महिन्याची होऊनही तिचे वजन फार कमी होते. इको तपासणीत हृदयावर मोठे छिद्र असल्याचे निदान झाले. ११ मिलिमीटरपर्यंत छिद्र असल्याने इतर दोन ते तीन टप्प्यात शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला इतर डॉक्टरांनी दिला. १ मार्च रोजी आस्थाला रामदासपेठ येथील बेबी हार्ट सेंटर, सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ. खानझोडे यांनी तिची पूर्ण तपासणी केली. त्यावेळी तिला सर्दी, खोकला असल्याने शस्त्रक्रिया एप्रिल महिन्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. खानझोडे म्हणाले, आस्थाचे कमी वजन आणि हृदयाचे छिद्र मोठे असल्याने दोन ते तीन वेळा करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेची जोखीम ती उचलू शकत नव्हती. तिला शस्त्रक्रियेला घेतले आणि पहिल्यांदाच ‘इन्ट्रा आॅपरेटीव्ह ट्रान्ससोफेजल इकोकार्डिओग्राफी’चा वापर केला. यात तोंडावाटे अन्ननलिकेच्या माार्गाने हृदयाची सोनोग्राफी करण्यात आली. या उपचारपद्धतीमुळे एकाच शस्त्रक्रियेत मोठे छिद्र बंद करण्याचा विश्वास प्राप्त झाला.
३० मिनीटे हृदय ठेवले बंद
डॉ. खानझोडे म्हणाले, ही एक ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया असते. यात आस्थाचे हृदय २५ ते ३० मिनिटे बंद करून ठेवले होते. एका यंत्राच्या मदतीने रक्तपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता. हृदयाच्या दोन कप्प्यातील पडद्यावर असलेले मोठे छिद्र बंद केले. परंतु ते छिद्र व्यवस्थित बंद झाले की नाही यासाठी बंद हृदय सुरू करून पाहिले. सर्व सुरळीत असल्याचे निदान झाल्यावर यंत्राद्वारे कृत्रिम रक्त पुरवठा बंद करण्यात आला. सलग चार तास चाललेली जोखमीची शस्त्रक्रिया ‘टीईई’च्या मदतीने सोपी व सहज झाली, असेही ते म्हणाले. ही शस्त्रक्रिया डॉ. खानझोडे, डॉ. प्रमोद आंबटकर, डॉ. विनय कुलकर्णी व डॉ. श्रीकांत बोबडे यांनी मिळून केली.

Web Title: And the heart hole of the baby made closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.