आणि माणसाची सावली दिसेनाशी झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 09:44 PM2020-05-26T21:44:30+5:302020-05-26T21:48:45+5:30

अंधार असल्याशिवाय सावली आपली साथ सोडत नाही, असे म्हणतात पण मंगळवारी तो क्षण आलाच. दुपारी १२.१० ची वेळ झाली आणि काही क्षणापूरती आपली सावली दिसेनाशी झाली. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. विशेष म्हणजे हा अनुभव केवळ नागपूरकरानाच घेता आला. कारण खगोलशास्त्राची ही अलौकिक घटना घडण्यासाठी केवळ उपराजधानीची स्थिती अनुकूल होती.

And the shadow of the man disappeared | आणि माणसाची सावली दिसेनाशी झाली

आणि माणसाची सावली दिसेनाशी झाली

Next
ठळक मुद्देनागरिकांनी अनुभवला शून्य सावली दिवस : पृथ्वीचा कोन साडे २३ अंश कलल्याने ही स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंधार असल्याशिवाय सावली आपली साथ सोडत नाही, असे म्हणतात पण मंगळवारी तो क्षण आलाच. दुपारी १२.१० ची वेळ झाली आणि काही क्षणापूरती आपली सावली दिसेनाशी झाली. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. विशेष म्हणजे हा अनुभव केवळ नागपूरकरानाच घेता आला. कारण खगोलशास्त्राची ही अलौकिक घटना घडण्यासाठी केवळ उपराजधानीची स्थिती अनुकूल होती.
सूर्य डोक्यावर येतो किंवा आला असे आपण म्हणतो पण प्रत्यक्षात दोन दिवस वगळता सूर्य कधीच आपल्या डोक्यावर येत नाही, थोडा ना थोडा तो तिरपा असतोच. तो प्रत्यक्ष डोक्यावर येण्याचे दोन दिवस म्हणजे २६ मे आणि १७ जुलै. याचे शास्त्रीय कारणही तसे महत्त्वाचे आहे. रमण विज्ञान केंद्राचे शिक्षक विलास चौधरी यांनी झिरो शॅडो डे चे शास्त्रीय कारण समजावून सांगितले. आकाशातून सूर्याचे भ्रमण उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे होत असते ज्याला उत्तरायण व दक्षिणायन म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना साडेतेवीस अशाचा कोन करीत असते. ज्या दिवशी, ज्या वेळी हा कोन होतो त्या वेळी शून्य सावली दिवस येतो. मजेशीर बाब म्हणजे हा सर्वत्र सारखा नसतो तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागात असतो.रमण विज्ञान केंद्र दरवर्षी झिरो शॅडो दे चे मार्गदर्शक आयोजन करीत असतो मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही.

नागपुरातच सावली का गायब झाली ?
तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की नागपुरात शून्य सावली का झाली. उत्तर आहे... विलास चौधरी यांनी सांगितले, नागपूर शहराचा अक्षांश २१.१७ अंश आहे. सूर्याचा डिक्लीणेशन पॉईंट उत्तरायण किंवा दक्षिणायन करताना २१.१७ अंश असतो तेव्हा नागपुरात सूर्य डोक्यावर येतो. म्हणजेच दुपारी १२.१० वाजता सूर्याचा डिक्लीणेशन पॉईंट २१.१० अंश असल्याने आज शून्य सावली दिवस अनुभवता आला.

११५० लोकांनी पाहिले फेसबुक लाईव्ह
लॉकडाऊन लक्षात घेता रमण विज्ञान केंद्रातर्फे केंद्राच्या फेसबुक पेजवर शून्य सावली दिवस लाईव्ह करण्यात आला. मंगळवारी आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल ११५० च्यावर लोकांनी या क्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. केंद्रात यासाठी व्यवस्था व्यवसथा करण्यात आली होती आणि यावेळी काही लोक उपस्थित होते.

Web Title: And the shadow of the man disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.