... अन् म्हणून प्रवासी करतो ‘वंदे भारत’ला नमन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 11:08 PM2022-12-11T23:08:18+5:302022-12-11T23:08:31+5:30
प्रवास आरामदायी बनवण्यासाठी आसनांसोबतच अन्य आधुनिक सुविधांनी तिला सज्ज करण्यात आले आहे.
नागपूर : मध्य भारतातील नागपूर ते बिलासपूर या मार्गावर सुरू झालेल्या हाय स्पिड वंदे भारत ट्रेनमध्ये ईतक्या सोयी, इतक्या सुविधा आहेत. तिचे इतके वैशिष्ट्ये आणि धक्का न लागू देता ती प्रवाशांना त्यांच्या ईच्छित स्थानकावर सोडते. म्हणूनच प्रवासी वंदे भारतला नमन केल्याशिवाय राहत नाही.
११२८ प्रवासी आणि चालकांसह चार कर्मचारी अशी एकूण ११३२ ची क्षमता असलेली वंदे भारत फेब्रुवारी २०१९ ला सर्वप्रथम दिल्ली वाराणसी, नंतर दिल्ली कटरा, नंतर मुंबई गांधीनगर कॅपिटल, दिल्ली अम्ब अंदोरा, चेन्नई म्हैसूर आणि आता आजपासून सुरू झालेली नागपूर बिलासपूर ही देशातील सहावी वंदे भारत एक्सप्रेस आहे. हिची बनावट पूर्णत: स्वदेशी आहे. या ट्रेनमध्ये जीपीएस आधारित पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम (पीआयएस) आणि स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे आहेत.
प्रवास आरामदायी बनवण्यासाठी आसनांसोबतच अन्य आधुनिक सुविधांनी तिला सज्ज करण्यात आले आहे. हिच्यात इमर्जन्सी अलार्म बटण आणि इमर्जन्सी टॉक बॅक युनिट्ससुद्धा आहे. त्यामुळे प्रवासी आपत्कालीन परिस्थितीत थेट ट्रेनच्या चालकाशी आणि अन्य कर्मचाऱ्यांशी बोलू शकतात. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही देण्यात आले आहेत. यात प्लॅटफॉर्म साइड कॅमेरे देखील आहेत. ज्यात डब्याच्या बाहेर रीअरव्ह्यू कॅमेऱ्यांचा समावेश आहे.
ही सुद्धा आहेत वैशिष्ट्ये...
- इतर प्रवासी माध्यमांच्या तुलनेत नागपूर ते बिलासपूर दरम्यान रेल्वे प्रवासाचा वेळ वाचेल.
- सर्व डबे पूर्णपणे सीलबंद गँगवेद्वारे एकमेकांशी संलग्न.
- गँगवेचे बाह्य फेअरिंग अशा प्रकारे डिझाइन केले गेले की ते हवेचा भार कमी करेल.
-गरमागरम जेवण, शितपेय, वायफाय ऑन डिमांड
असे आहे एक्झिकेटिव्ह भाडे
नागपूर - गोंदिया : ९३५ रुपये
नागपूर - राजनांदगाव : १३०५ रुपये
नागपूर - दुर्ग : १४२० रुपये
नागपूर - रायपूर : १५४० रुपये
नागपूर - बिलासपूर : १८९० रुपये
सर्वसाधारण भाडे
नागपूर - गोंदिया : ४८० रुपये
नागपूर - राजनांदगाव : ६६० रुपये
नागपूर - दुर्ग : ७२० रुपये
नागपूर - रायपूर : ७७५ रुपये
नागपूर - बिलासपूर : ९५५ रुपये
आठवड्यातून सहा दिवस
ही रेल्वेगाडी आठवड्यातून ६ दिवस चालणार आहे. नागपूरहून ती रोज (शनिवार वगळता) दुपारी २.०५ वाजता सुटेल आणि रात्री ७.३५ वाजता बिलासपूरला पोहचेल. तर, बिलासपूरहूनसकाळी६.४५ वाजता सुटेल आणि नागपुरात दुपारी १२.१५ वाजता पोहचेल. रायपूर, दुर्ग, राजनांदगाव आणि गोंदिया या चार स्थानकावर हिचे थांबे राहणार आहे.