...अन् तुकाराम मुंढे म्हणाले ‘ऑल इज वेल’ ‘सोशल मीडिया’वर समर्थन वाढीस  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 04:09 AM2020-08-30T04:09:06+5:302020-08-30T04:10:35+5:30

बदली होण्याच्या एक दिवस अगोदर मुंढे यांची ‘कोरोना’ चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली होती. त्यानंतर ते ‘क्वॉरंटाईन’ झाले होते. त्यानंतर मुंढे यांची प्रकृती कशी आहे याबाबत जनसामान्यांकडूनदेखील विचारणा होत होती. त्यातच बदलीचा ‘बॉम्ब’ पडला आणि त्यांच्या समर्थकांमधील चिंता आणि रोष दोन्ही वाढीस लागले.

... And Tukaram Mundhe said, "All is well," and increased support on social media | ...अन् तुकाराम मुंढे म्हणाले ‘ऑल इज वेल’ ‘सोशल मीडिया’वर समर्थन वाढीस  

...अन् तुकाराम मुंढे म्हणाले ‘ऑल इज वेल’ ‘सोशल मीडिया’वर समर्थन वाढीस  

Next

नागपूर : तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरून बदलीच्या झाल्याच्या विरोधात नागपुरकरांमध्ये रोष वाढीस लागला आहे. मुंढे यांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या ‘सोशल मीडिया’वरील मोहिमेत मोठ्या प्रमाणावर तरुणाईदेखील जुळत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, ‘कोरोना’बाधित असलेल्या मुंढे यांनी ‘आॅल इज वेल’ असल्याची प्रतिक्रिया दिली आणि त्यांची काळजी करणाऱ्या समर्थकांना दिलासा मिळाला.

बदली होण्याच्या एक दिवस अगोदर मुंढे यांची ‘कोरोना’ चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली होती. त्यानंतर ते ‘क्वॉरंटाईन’ झाले होते. त्यानंतर मुंढे यांची प्रकृती कशी आहे याबाबत जनसामान्यांकडूनदेखील विचारणा होत होती. त्यातच बदलीचा ‘बॉम्ब’ पडला आणि त्यांच्या समर्थकांमधील चिंता आणि रोष दोन्ही वाढीस लागले.

अखेर मुंढे यांनी स्वत: आपल्या प्रकृतीबाबत ‘सोशल मिडीया’वरुन माहिती दिली. मागील साडे पाच महिने ‘कोरोना’शी लढत असताना २४ आॅगस्ट रोजी माझी ‘कोरोना’ चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली. लक्षणे नसली तरी चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्याने शासनाच्या नियमावलीनुसार मी स्वत:ला गृह विलगीकरणात ठेवले. मास्क लावणे, कुटुंबातील कुठलाही सदस्य मी असलेल्या खोलीत न येणे, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स आणि झिंक गोळ्यांचे सेवन करणे, ‘थर्मल स्कॅनिंग’ द्वारे ठराविक काळानंतर शरीराचे तापमान तपासणे आदी सर्व दिशानिदेशांचे पालन करीत आहे. ज्यांना-ज्यांना लक्षणे नाहीत मात्र ते पॉझिटिव्ह आले आहेत, अशा सर्वांनी गृह विलगीकरणाच्या नियमावलीचे पालन करावे. आपणापासून इतरांना संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.

राजकारण्यांविरोधात नाराजी
मुंढे यांच्या समर्थनार्थ नागरिकांकडून ‘सोशल मिडीया’वर जी मोहिम चालविण्यात येत आहे, त्यात संतप्त प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. मुंढे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष अधिकारी नागपुरकरांसाठी झटत होता. येथील नसतानादेखील ते शहरवासियांसाठी दिवसरात्र काम करत होते. मात्र राजकीय बुद्धिबळात त्यांचा बळी देण्यात आला, अशा भावना लोक व्यक्त करत आहेत. विशेषत: सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींविरोधात नाराजीचा सूर आहे.
काही महिलांनी कपडे फाडून आपले चारित्र्यहनन करून बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मनपाचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. मुंढे यांनी केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने यातील सत्य बाहेर येण्यासाठी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महापालिकेतील कामगार नेते जम्मू आनंद यांनी शनिवारी सदर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत केली आहे.

‘माफी मागा, अन्यथा पोलिसांत तक्रार करू’
नागपूर : काही महिलांनी कपडे फाडून आपले चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. यावर भाजपच्या महिला नगरसेविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून मुंढे यांनी सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा भाजप महिला आघाडी व मनपाच्या महिला नगरसेविका त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करतील, असा इशारा दिला आहे.
भाजपचे वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत सांगितले की, मुंढे यांच्यासोबत जी घटना घडली त्याची वेळ व स्थळ कोणते होते याची घोषणा करावी. किती महिलांनी कपडे फाडले त्यांची संख्याही सांगायला हवी. आयुक्तांना भेटणाºया प्रत्येक व्यक्तीचे नाव रजिस्टरमध्ये नोंदवले जाते. त्यांची नावेही जाहीर करायला हवी. ते आयएएस अधिकारी आहेत. अशी घटना घडल्यावर त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करायला हवा होता. इतके दिवस ते गप्प का राहिले. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी हे सर्व केले असा आरोपही त्यांनी केला.

मग तेव्हा गप्प का राहिले
मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महिलांबाबत केलेले वक्तव्य निंदनीय आहे. ज्या घटनेचा उल्लेख मुंढे यांनी केला आहे, त्याचे नावही त्यांनी सांगावे, अन्यथा माफी मागावी. जर त्यांनी माफी मागितली नाही तर पोलिसात तक्रार करू.
- संदीप जोशी, महापौर

Web Title: ... And Tukaram Mundhe said, "All is well," and increased support on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.