- अन् मुख्यमंत्री ठाकरे काही क्षण स्तब्ध होतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 10:38 PM2019-12-17T22:38:46+5:302019-12-17T22:40:16+5:30

सूर्यास्तावेळी विधान भवनातून मुख्यमंत्री ठाकरे बाहेर पडत असताना विधान भवनावरील राष्ट्रध्वज उतरविणे सुरु होते. हे ठाकरे यांच्या लक्षात येताच ते विधानभवन परिसरात थांबले. राष्ट्रध्वज संहितेचे पालन करीत ध्वज उतरविल्यानंतर ते विधानभवनातून बाहेर पडले.

- And when Chief Minister Thackeray stops for a moment ... | - अन् मुख्यमंत्री ठाकरे काही क्षण स्तब्ध होतात तेव्हा...

- अन् मुख्यमंत्री ठाकरे काही क्षण स्तब्ध होतात तेव्हा...

Next
ठळक मुद्देराष्ट्रध्वज संहितेचे केले पालन : मानवंदवना दिली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्यावर विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे विधिमंडळाचे कामकाज मंगळवारी दिवसाभरासाठी तहकूब करण्यात आले. यानंतर दिवसभर सत्ताधारी आणि विरोधकात शेतकऱ्याच्या मुद्यावर कलगीतुरा रंगला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी दुपारी समाचारही घेतला.
दिवसभराच्या गोंधळात मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधानभवनात विविध शासकीय कामकाजाचा आढावा घेतला. सूर्यास्तावेळी विधान भवनातून मुख्यमंत्री ठाकरे बाहेर पडत असताना विधान भवनावरील राष्ट्रध्वज उतरविणे सुरु होते. हे ठाकरे यांच्या लक्षात येताच ते विधानभवन परिसरात थांबले. राष्ट्रध्वज संहितेचे पालन करीत ध्वज उतरविल्यानंतर ते विधानभवनातून बाहेर पडले. मुख्यमंत्री राष्ट्रध्वज संहितेचे पालन करीत असल्याचे पाहून विधान भवन परिसरात उभे असलेले विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, अधिकाऱ्यांनाही त्यांच्या भूमिकेबद्दल अभिमान वाटला.
राष्ट्रध्वजाला फडकवत वा उतरवत असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे.
राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहीत आहे. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे. संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगुल वाजविलाच पाहिजे.
राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोशाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतात. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल तेव्हा तो सावधान स्थितीत उभा राहील. सरकारी अधिकाऱ्यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे.

Web Title: - And when Chief Minister Thackeray stops for a moment ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.