घुसखोरीमुळे आंध्र, केरळ आणि प. बंगालची स्थिती चिंताजनक : विहिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 08:02 PM2019-10-12T20:02:26+5:302019-10-12T22:53:38+5:30

शेजारी राष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये घुसखोरी सुरू आहे. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. यामुळे जिहादी कारवायाही वाढल्याची चिंता विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलींद परांडे यांनी व्यक्त केली.

Andhra Pradesh, Kerala and W Bengal situation worrisome due to insurgency - VHP | घुसखोरीमुळे आंध्र, केरळ आणि प. बंगालची स्थिती चिंताजनक : विहिप

घुसखोरीमुळे आंध्र, केरळ आणि प. बंगालची स्थिती चिंताजनक : विहिप

Next
ठळक मुद्देजिहादी कारवाया वाढल्या : हितचिंतक अभियानातून करणार जनजागरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेजारी राष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये घुसखोरी सुरू आहे. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. यामुळे देशातील लोकसंख्येच्या असंतुलनाचा धोका निर्माण झाला असून जिहादी कारवायाही वाढल्याची चिंता विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलींद परांडे यांनी व्यक्त केली.
विहिपच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, आंध्र व केरळमध्ये जिहादी कारवाया जोरात सुरू असून तिथे चार हजारांवर मुली बेपत्ता आहेत. घुसखोरांच्या माध्यमातून तिथे ह्युमन ट्राफिक सुरू आहे.
ममता बॅनर्जी या संवैधानिक पदावर असतानाही एक प्रकारे घुसखोरांची पाठराखण करीत आहे. आपले ओळखपत्र हरविल्याची तक्रार पोलिसात करा, असा सल्ला त्या देत आहेत. यामुळ्य देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका पोहचू शकतो. योग्य प्रक्रिया पार पाडून शेजारच्या राष्ट्रातून भारतात शरण येणाऱ्या हिंदूंच्या सुरक्षेसाठी आणि सहकार्यासाठी भारत सरकारने सहकार्य करावे, अशी विहिपची मागणी आहे. या संदर्भात विहिपची भूमिका सांगताना ते म्हणाले, बांगलादेश व म्यानमारमधून भारतामध्ये येणारे प्रताडित हिंदू शरणार्थी असून रक्षणयोग्य आहेत. मात्र तिथून येणारे मुस्लिम घुसखोर आहेत. त्यांना शोधून देशाबाहेर घालवावे, अशी आमची भूमिका आहे.
तिरूपती मंदिरासह अन्य हिंदू मंदिरांमध्ये गैरहिंदूनांना नोकऱ्या देण्याची घोषणा या सरकारने केली आहे. तेथील सेव्हन हिल्समधून धर्मांतराचे काम सुरु आहे. हे काम संविधान विरोधातील आहेत. त्याविरूद्ध आम्ही न्यायलयाकडे दाद मागू.
१७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळामध्ये देशभर ‘हितचिंतक अभियान’ राबविले जाणार आहे. या माध्यमातून ५१ लाखांपेक्षा अधिक हिंदूंना जागृत करून विहिपसोबत जोडले जाईल. विदर्भ प्रांतामध्ये दोन लाख लोकांना या अभियानात सहभागी केले जाणार आहे. मागील अभियानातून ३२ लाखांवर अधिक नागरिकांना जोडण्यात आले होते. आमचे संघटन कोणाही विरूद्ध नाही. त्रीशुळ हे आमचे धार्मिक प्रतिक असून ते वाटणे अयोग्य नाही. आजवर अनेकदा आम्ही त्रीशुळ वाटले आहेत, अशा शब्दात त्यांनी त्रीशुळ वाटपे समर्थन केले. यावेळी विहिपचे प्रांतमंत्री गोविंद शेंडे आणि नागपूर महानगर मंत्री प्रशांत चित्रे उपस्थित होते.
जगमोहन रेड्डी सरकारची हिंदूविरोधी पावले
आंध्र प्रदेशात निवडून आलेल्या जगनमोहन रेड्डी सरकारने हिंदूविरोधी पावले उचलल्याचा आरोप करून परांडे म्हणाले, समाजातील वंचितांना घरे बांधण्यासाठी मंदिरांची जमीन देण्याची घोषणा या सरकारने केली आहे. या निर्णयाला विरोध नाही. मात्र केवळ हिंदू मंदिरांचीच जमीन का द्यावी. अनेक चर्चला मिळालेल्या लीजवरील जमिनींची ९९ वर्षांची मुदत १९९४ मध्येच संपली आहे. वक्फ बोर्डाच्या कितीतरी जमिनी रिकाम्या पडून आहेत. त्यासुद्धा द्याव्यात. हिंदू मंदिरांना दानात मिळालेल्या या जमिनी आहेत. मंदिराच्या विकासाचे आणि व्यवस्थापनाचे काम त्यातून चालावे, हा त्यामागील हेतू होता. याला विहिंपचा विरोध राहील.

Web Title: Andhra Pradesh, Kerala and W Bengal situation worrisome due to insurgency - VHP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.