गूढता, शृंगार अन् तत्त्वज्ञानाची विलक्षण सांगड!
By admin | Published: October 29, 2014 12:41 AM2014-10-29T00:41:48+5:302014-10-29T00:41:48+5:30
गे्रसांच्या कवितेतील विस्मयकारी गूढता...भटांच्या कवितेतला अप्रतिम शृंगार... आणि म़ म़ देशपांडेंच्या कवितेतील सत्त्वशील तत्त्वज्ञानाची सुरेल सांगड घालत विदर्भातील या तिन्ही शब्दप्रभूंच्या
‘रणांगण’चे प्रकाशन : ग्रेस, सुरेश भट, म़ म़ देशपांडेंच्या कवितांचा वेध
नागपूर : गे्रसांच्या कवितेतील विस्मयकारी गूढता...भटांच्या कवितेतला अप्रतिम शृंगार... आणि म़ म़ देशपांडेंच्या कवितेतील सत्त्वशील तत्त्वज्ञानाची सुरेल सांगड घालत विदर्भातील या तिन्ही शब्दप्रभूंच्या काव्यप्रवासाचा आढावा घेणारी एक सुंदर मैफिल आज मंगळवारी शंकरनगरातील बाबूराव धनवटे सभागृहात पार पडली़़ निमित्त होते ‘रणांगण’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे़ मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या या अंकाचे यंदा खास करून नागपुरात पुनर्प्रकाशन करण्यात आले़ यावेळी ग्रेस, सुरेश भट, म़ म़ देशपांडेंच्या काही निवडक कवितांचे सादरीकरण करण्यात आले़ या क्रमात सर्वप्रथम पुनित कुशवाह यांनी ग्रेस यांची ‘‘तुला पाहतो मी नदीच्या किनारी...’’ ही अत्यंत गाजलेली कविता सादर केली़ वैशाली उपाध्याय यांनी ‘‘ तरुण आहे रात्र अजूनी राजसा निजलास का रे...’’ या कवितेद्वारे रसिकांचे मन जिंकले तर पुनित कुशवाह यांनी पुन्हा आपल्या सुरेख आवाजात म़ म़ देशपांडे यांची ‘‘अंतरिक्ष फिरलो पण, गेली ना उदासी...’’ ही कविता अत्यंत ताकदीने सादर केली़ या सर्व कवितांचे निरुपण शाम माधव धोंड यांनी केले तर पुरुषोत्तम माकोडे यांनी भटांच्या काही आठवणी श्रोत्यांना ऐकवल्या़(प्रतिनिधी)