अंगणवाडी सेविकांचे ‘माेबाईल वापस कराे’ आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:12 AM2021-09-15T04:12:56+5:302021-09-15T04:12:56+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना ‘पाेषण ट्रॅकर’ या ॲपवर माहिती नमूद करणे अनिवार्य केले आहे. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना ‘पाेषण ट्रॅकर’ या ॲपवर माहिती नमूद करणे अनिवार्य केले आहे. हे ॲप इंग्रजीत असल्याने तसेच शासनाच्या वतीने देण्यात आलेले माेबाईल फाेन सुमार दर्जाचे असल्याने त्यांना राेज विविध समस्यांना सामाेरे जावे लागत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी (दि. १४) दुपारी माैदा शहरातील बालविकास प्रकल्प कार्यालयासमोर निदर्शने करीत ‘माेबाईल वापस कराे ’ आंदाेलन केले. या आंदाेलनात तालुक्यातील १८० पैकी १७६ अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या हाेत्या.
शासनाने अंगणवाडी सेविकांना दिलेल्या माेबाईल फाेनची वाॅरंटी ही दाेन वर्षाची आहे. त्यानंतर हा फाेन दुरुस्त करण्यासाठी किमान तीन ते पाच हजार रुपये खर्च येताे. हा खर्च वारंवार करणे परवडत नसल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले. त्यामुळे शासनाने आपल्याला नवीन दर्जेदार माेबाईल फाेन द्यावे तसेच इतर समस्या साेडवाव्या अशी मागणीही त्यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी माधुरी खोब्रागडे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या आंदाेलनात अंगणवाडी सेविका व मदतनीस संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम काळे, जिल्हा सचिव रेखा कोहाड, तालुकाध्यक्ष मंगला चामट, सचिव ललिता पिकलमुंडे, कार्याध्यक्ष पुष्पा बिसने, वीणा शेंडे, संघा डहाट, उषा तांबुलकर, बेबीनंदा गजभिये यांच्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या हाेत्या.
...
या आहेत समस्या
शासनाने दिलेल्या माेबाईल फाेनची रॅम केवळ दाेन जीबी आहे. त्यामुळे हा फाेन लवकर गरम हाेताे. चार्जिंग हाेण्यास बराच वेळ लागताे. या माेबाईल फाेनमध्ये वारंवार बिघाड निर्माण हाेताे. हा फाेन वारंवार हॅंग हाेताे. पाेषण ट्रॅक्टर ॲप इंग्रजीत असल्याने त्यावर माहिती नमूद करताना अडचणी येतात. इंग्रजी ऐवजी मराठीत माहिती नमूद करणे साेपे जाते. ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या असल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले.