देवदूत भेटला अन् वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला!

By admin | Published: November 2, 2015 02:22 AM2015-11-02T02:22:55+5:302015-11-02T02:22:55+5:30

दोनवेळच्या पोटासाठी मायबापांचा आयुष्यभर सुरू असलेला संघर्ष. त्यातच आई जग सोडून गेली.

Angels have met and the joy of father's father was heard in the sky! | देवदूत भेटला अन् वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला!

देवदूत भेटला अन् वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला!

Next

दोन महिन्यापासून घरापासून दुरावलेल्या मुलाची घडविली भेट
नागपूर : दोनवेळच्या पोटासाठी मायबापांचा आयुष्यभर सुरू असलेला संघर्ष. त्यातच आई जग सोडून गेली. आईविना पोरक्या झाल्यामुळे आईच्या आठवणींनी तो अस्वस्थ होता. शाळेत मन लागत नव्हते. एका दिवशी गुरुजींनी रागविले, त्यातच आईची आठवण त्याला अस्वस्थ करीत होती. दोन महिन्यापूर्वी तो अचानक बेपत्ता झाला. घरात चिंतेचे वातावरण पसरले, शोधाशोध सुरू झाली. गुरुवारी हिमांशूच्या रुपाने देवदूत भेटला. घरापासून दूरावलेल्या या मुलाची हिमांशूने घरच्यांशी भेट घडवून दिली.
विकास कांताराम घुगल असे या मुलाचे नाव असून, तो सावनेर तालुक्यातील जैतपूर या गावाचा रहिवासी आहे. १५ वर्षीय विकासच्या आईचा तीन वर्षापूर्वी मृत्यू झाला. घरी वडील मजुरी करायचे. मोठा भाऊ एका गॅरेजमध्ये काम करीत होता. आईच्या मृत्यूनंतर विकास अस्वस्थ झाला होता. शाळेतही त्याचे मन लागत नव्हते. घरची परिस्थितीही नाजूक असल्याने, कुणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. दोन महिन्यापूर्वी तो कुणालाही न सांगता घराबाहेर पडला. भटकत नागपुरात पोहचला. वर्धा रोडवरील एका धाब्याच्या मालकाने त्याला कामावर ठेवले. मात्र घरच्यांची चिंता वाढली, शोधाशोध सुरू झाली. पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली. परंतु तो सापडला नाही, शेवटी घरच्यांनीही अपेक्षा सोडली.
शाहू नगर येथील रहिवासी सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला हिमांशू ठवकर गुरुवारी ढाब्यावर जेवायला गेला. तेव्हा विकास त्याच्यासमोर रडू लागला. घरच्यांना भेटण्यासाठी आग्रह करू लागला. हिमांशूने ढाब्याच्या मालकाला विनंती करून विकासला घरी आणले. त्याला रात्रभर घरी ठेवले. त्याच्या घरच्यांची विचारणा केली. सावनेर डेपोचा दूरध्वनी क्रमांक मिळविला. तिथे पांडे नावाच्या व्यक्तीशी त्याने संपर्क साधला. डेपोच्या जवळच विकासचा भाऊ आकाश हा गॅरेजमध्ये काम करायचा. पांडे यांनी आकाशला माहिती देऊन हिमांशूशी संपर्क साधायला लावला. दोघांचे बोलणे झाल्यानंतर, हिमांशूने त्याला घरी बोलावून, विकासला त्यांच्या सुपूर्द केले. (प्रतिनिधी)

एक चांगले काम हातून घडल्याचे समाधान
घरच्यांच्या भेटीसाठी विकास रडत असताना बघून मी अस्वस्थ झालो. तेव्हाच त्याच्या घरच्यांशी भेट घडवून देण्याचा निर्णय घेतला. आईला सांगून मी त्याला घरी आणले. सुदैवाने त्याच्या घरच्यांशीही सहज संपर्क झाला. माझ्या माध्यमातून विकासला घर मिळाल्याचे मला समाधान आहे. मदतीची भावना प्रत्येकानेच जपावी, असे मला वाटते.
हिमांशू ठवकर, सॉॅफ्टवेअर इंजिनिअर

Web Title: Angels have met and the joy of father's father was heard in the sky!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.