ज्येष्ठांच्या निष्क्रियतेवर नाराजी
By Admin | Published: July 12, 2016 02:59 AM2016-07-12T02:59:25+5:302016-07-12T02:59:25+5:30
महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. मात्र, लोकसभा व विधानसभा लढलेले नागपुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांच्या या
वडेट्टीवारांच्या घरी प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक
निवडणुका तोंडावर, नेते घराबाहेर पडेनात
कमलेश वानखेडे ल्ल नागपूर
महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. मात्र, लोकसभा व विधानसभा लढलेले नागपुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीसाठी पुढाकार घेताना दिसत नाहीत. त्यामुळे आता आपल्यालाच काहीतरी करावे लागेल, असा निरोप देत प्रदेश काँग्रेसच्या नागपुरातील पदाधिकाऱ्यांची रविवारी गुप्त बैठक झाली. नागपूरचे पालक पदाधिकारी असलेले आ. विजय वडेट्टीवार यांनी या बैठकीचे नेतृत्व केले. बैठकीत, ज्येष्ठ नेते हे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी कुठलेही नियोजन आखताना दिसत नाही. वरिष्ठ नेत्यांकडून अजिबात सहकार्य मिळत नाही. त्यामुळे आता दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना समोर करून काँग्रेसने मैदानात उतरावे, अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची संमती घेऊनच ही बैठक घेण्यात आल्याची माहिती आहे.
आ. वडेट्टीवार यांच्या घरी रविवारी दुपारी झालेल्या या बैठकीत नागपूर शहर जिल्हा काँग्रेसचे प्रभारी व प्रदेश महासचिव झिया पटेल, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, विनोद जैन यांच्यासह प्रदेश सरचिटणीस डॉ. बबनराव तायवाडे, प्रफुल्ल गुडधे, अभिजित सपकाळ, रामकिशन ओझा, सचिव अतुल कोटेचा, नितीन कुंभलकर, उमाकांत अग्निहोत्री, मुजीब पठाण उपस्थित होेते.
प्रदेश पदाधिकाऱ्यांशिवाय कुणालाही बैठकीचे निरोप देण्यात आले नव्हते.
शहर कार्यकारिणी त्वरित जाहीर व्हावी
४शहर अध्यक्ष विकास ठाकरे शहरातील विविध प्रश्न घेऊन लढा देत आहेत. मात्र, त्यांना पक्षातर्फे पाठबळ मिळण्यासाठी शहर कार्यकारिणी त्वरित जाहीर होणे आवश्यक आहे. पद मिळाले तर कार्यकर्त्यांना अधिकार मिळतील व त्यांचा काम करण्याचा उत्साह वाढेल. त्यामुळे शहर कार्यकारिणीला त्वरित मंंजुरी द्यावी, अशी विनंती प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.