संतप्त महिलांचा ग्रामपंचायतवर माेर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:07 AM2021-07-12T04:07:13+5:302021-07-12T04:07:13+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : रनाळा (ता. कामठी) येथील महावीर नगरातील मुख्य मार्गालगत असलेल्या बार ॲण्ड रेस्टारंटमुळे तरुणी व ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : रनाळा (ता. कामठी) येथील महावीर नगरातील मुख्य मार्गालगत असलेल्या बार ॲण्ड रेस्टारंटमुळे तरुणी व महिलांना त्रास हाेत असून, तिथे आक्षेपार्ह कामे केली जातात. त्यामुळे ते बार ॲण्ड रेस्टारंट हटविण्यात यावे, या मागणीसाठी संतप्त महिलांनी रनाळा ग्रामपंचायत कार्यालयावर रविवारी (दि. ११) दुपारी माेर्चा नेला. यावेळी महिलांनी सरपंच सुवर्णा साबळे यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे मागण्यांचे साेपविले.
रनाळा येथील महावीर नगराची श्रीमंत नागरिकांची वस्ती अशी ओळख आहे. या नगरातील सर्वे क्रमांक-२८/०३ मधील भूखंड क्रमांक-४ वर काही दिवसांपूर्वी बार ॲण्ड रेस्टारंट व लाॅजिंग सुरू करण्यास शासन व प्रशासनाने परवानगी दिली. या लाॅजमध्ये काही अल्पवयीन मुलींना आणून त्यांच्याकडून आक्षेपार्ह कामे करवून घेतली जातात. हा प्रकार लक्षात येताच या नगरातील नागरिकांनी प्रशासनाकडे बार ॲण्ड रेस्टारंटची परवानगी रद्द करण्याची तक्रारवजा मागणी केली. परंतु, प्रशासनाने ही मागणी अद्यापही गांभीर्याने घेतली नाही.
या बार, रेस्टारंट व लाॅजिंगमधील आक्षेपार्ह वर्तन व हालचालींमुळे महावीर नगरातील सामाजिक वातावरण खराब हाेत असून, प्रसंगी तणावाची परिस्थिती निर्माण हाेते. त्यामुळे नागरिकांच्या भावना लक्षात घेता या बार, रेस्टारंट व लाॅजिंगची परवानगी कायम रद्द करावी, अशी मागणीही संतप्त महिलांनी यावेळी केली. मार्चात शीतल चाैधरी, संध्या रायबाेले यांच्यासह माेठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या हाेत्या.
...
पाेलिसांची धाड
रनाळा येथील बार ॲण्ड रेस्टारंटच्या मालकाचे कामठी शहरातील बसस्थानक चाैकात बार, रेस्टारंट व लाॅजिंग आहे. त्या लाॅजमध्ये देहव्यापार केला जात असल्याने पाेलिसांच्या धाडीत उघड झाले आहे. पाेलिसांनी त्या प्रकरणात ‘पीटा’ अन्वये गुन्हा देखील दाखल केला आहे. हा अनुभव असताना प्रशासनाने त्याच मालकाला रनाळा येथे बार, रेस्टारंट व लाॅजिंग सुरू करण्यास परवानगी का दिली, असा प्रश्नही महिलांनी यावेळी सरपंच सुवर्णा साबळे यांच्याशी चर्चेदरम्यान उपस्थित केला.