अनिल भिकाने माफसूच्या विस्तार शिक्षण संचालक पदी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:12 AM2021-08-22T04:12:31+5:302021-08-22T04:12:31+5:30
डॉ. भिकाने यानी उदगीर येथे २७ वर्षाची प्रदिर्घ सेवा दिली असून तत्पूर्वी चार वर्ष ते लातूर व ...
डॉ. भिकाने यानी उदगीर येथे २७ वर्षाची प्रदिर्घ सेवा दिली असून तत्पूर्वी चार वर्ष ते लातूर व परभणी येथे तर गेले वर्षभर अकोला येथे अधिष्ठाता पदावर कार्यरत होते. उदगीर व अकोल्याचे पशुवैद्यक महाविद्यालय लोकाभिमुख बनवण्यात त्यांचा वाटा होता. विशेष म्हणजे डॉ. भिकाने यांनी प्रयोगशाळेच्या चार भितिंत न अडकता प्रत्यक्ष गोठ्यावर जावून मराठवाड्यातील अनेक बेरोजगार तरुणाना प्रोत्साहित करून दुग्ध व शेळीपालन व्यवसायाच्या माध्यमातून स्वंयरोजगारासाठी प्रवृत्त केले आहे. त्यानी मराठवाड्यातील विविध खेड्यात ४५० पशुरोग निदान शिबीरा द्वारे दिड लक्ष पशुरुग्णाना सेवा दिलेली असून ६०० हून अधिक शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्याना तांत्रीक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी शेळ्यातील प्लेग , म्हशीतील उरमोडी, लालमुत्र रोग,कोड फुटणे, सर्पदंश, रक्तदान, गोचीडताप, गजकर्ण आदी लोकोपयोगी विषयावर संशोधन केले आहे. त्यानी लिहलेली नउ पुस्तके देशभर पशुवैदयक व विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहेत. त्यानी सलग १७ वर्ष राज्य शिक्षण मंडळ व बालभारतीत निमंत्रक या भूमिकेतून उच्चमाध्यमीक स्तरावरील अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निर्मितीत सहभाग घेतला आहे. त्याना राष्ट्रीय स्तरावरील तीन सुवर्णपदकासह माफसूचे आदर्श प्राध्यापक, सर्वोत्कृष्ट संशोधक व विस्तार कार्यकर्ता असे तिन्ही बहुमान मिळाले आहेत. सध्याला ते व्हीआयपीएम या राष्ट्रीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून त्यानी उदगीरच्या मराठवाडा जनता विकास परिषद, मराठी विज्ञान परिषद, जिव्हाळा ग्रुप व ग्रीन आर्मीच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरणाच्या क्षेत्रात त्यानी मोलाचे योगदान दिले आहे.