अनिल देशमुख यांनी वाहिली शहीद जवानाला श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 10:45 AM2020-09-25T10:45:34+5:302020-09-25T10:47:24+5:30

सी आर पी एफ बटालियन हिंगणा येथील जवान नरेश बडोले यांना जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथे देशाचे रक्षण करतांना वीरमरण आले. डिगडोह वैशाली नगर येथे त्यांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री मा.ना. अनिल देशमुख साहेब यांनी जाऊन श्रद्धांजली वाहिली .

Anil Deshmukh paid homage to the martyred soldiers | अनिल देशमुख यांनी वाहिली शहीद जवानाला श्रद्धांजली

अनिल देशमुख यांनी वाहिली शहीद जवानाला श्रद्धांजली

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सी आर पी एफ बटालियन हिंगणा येथील जवान नरेश बडोले यांना जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथे देशाचे रक्षण करतांना वीरमरण आले. डिगडोह वैशाली नगर येथे त्यांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री मा.ना. अनिल देशमुख साहेब यांनी जाऊन श्रद्धांजली वाहिली त्याच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, जिल्हा परिषद सदस्य सुचिता विनोद ठाकरे हिंगणा पंचायत समिती सभापती बबनराव अव्हाळे, विनोद ठाकरे, धनश्री कलनायके, अपर्णा फुलझले आदी उपस्थित होते.

जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गोंदिया जिल्ह्यातील जवान नरेश उमराव बडोले (वय ४९) शहीद झाले. केंद्रीय राज्य राखीव दलाच्या (सीआरपीएफ) ११७ बटालियनमध्ये ते कार्यरत होते. गोंदिया जिल्ह्यातील अर्जनी तालुक्यातील बाम्हणी हे बडोले यांचे मूळ गाव. २४ एप्रिल १९७१ रोजी जन्मलेले बडोले १९८९ मध्ये सीआरपीएफला रुजू झाले होते. बडगम जिल्ह्यातील छदुरा परिसरात गस्तीवर असताना त्यांच्या पथकावर बुधवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. मोटरसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी बडोले यांच्या पथकाच्या दिशेनं अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी उडालेल्या धुमश्चक्रीत बडोले गंभीर जखमी झाले. जखमी बडोले यांची रायफल घेऊन दहशतवाद्यांनी पळ काढला. बडोले यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

Web Title: Anil Deshmukh paid homage to the martyred soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.