सीबीआय तपासणीबाबत अनिल देशमुख म्हणाले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 07:31 PM2021-04-24T19:31:34+5:302021-04-24T19:31:56+5:30

Nagpur News माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी शनिवारी सकाळी सीबीआयने केलेल्या तपासणीबाबत कुठलीच प्रतिक्रिया न देता ते कोविड रुग्णालयाची पाहणी करण्यास रवाना झाले.

Anil Deshmukh said about CBI investigation .. | सीबीआय तपासणीबाबत अनिल देशमुख म्हणाले..

सीबीआय तपासणीबाबत अनिल देशमुख म्हणाले..

Next
ठळक मुद्देकोविड रुग्णालयाची पाहणी करण्यास रवाना



लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी शनिवारी सकाळी सीबीआयने केलेल्या तपासणीबाबत कुठलीच प्रतिक्रिया न देता ते कोविड रुग्णालयाची पाहणी करण्यास रवाना झाले.
शनिवारी सकाळी देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानासह अन्य ठिकाणांवरही सीबीआयची पथके पोहचली होती.
या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या निवासस्थानासमोर केंद्राच्या विरोधात तुफान घोषणाबाजीही केली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नंतर अटक केली.
संध्याकाळपर्यंत ही चौकशी सुरू होती. सीबीआयचे पथक निघून गेल्यानंतर अनिल देशमुख आपल्या निवासस्थानाबाहेर आले तेव्हा पत्रकारांनी त्यांना घेरले. त्यावेळी त्यांनी, सीबीआयची चमू सर्च करायला आपल्या निवासस्थानी आली होती. त्यांना आम्ही संपूर्ण सहकार्य केले. आता मी माझ्या मतदारसंघात कोविड रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी जात आहे असे सांगितले.

Web Title: Anil Deshmukh said about CBI investigation ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.