अनिल वैद्य यांचा पीकविम्यावरील शोधप्रबंध सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:10 AM2021-03-16T04:10:08+5:302021-03-16T04:10:08+5:30
नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रामीण व पीक (कृषी) विमा तज्ज्ञ डॉ. अनिल वैद्य यांनी ‘पीक (कृषी) विमा : त्रुटी ...
नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रामीण व पीक (कृषी) विमा तज्ज्ञ डॉ. अनिल वैद्य यांनी ‘पीक (कृषी) विमा : त्रुटी आणि उपाय’ या विषयावरील शोधप्रबंध केंद्रशासनाकडे सादर केला आहे. या शोधप्रबंधावर नवी दिल्ली येथे एप्रिल महिन्यात कृषी शास्त्रज्ञ व तज्ज्ञ यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
-----
करिश्मा गलानी यांना कोरोना योद्धा सन्मान
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोककल्याण समितीच्या वतीने पशू संरक्षिका करिश्मा गलानी यांना कोरोना योद्धा सन्मान प्रदान करण्यात आला. संघचालक रमेश पसारी, माधवराव उराडे व मनोज लोया यांनी त्यांना सन्मानित केले.
-----------
शक्ती फाउंडेशनतर्फे भोजनदान
नागपूर : कोरोना संक्रमण आणि टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शक्ती फाउंडेशनच्या वतीने गरजूंना मदतीचा हात देण्यात आला आहे. संस्थेच्या वतीने शहरातील विविध भागात नि:शुल्क भोजनाचे वाटप केले जात आहे. मजुरी करणाऱ्यांना उपाशी राहावे लागू नये म्हणून महाल, सिरसपेठ, गणेशपेठ, दीघोरी, नंदनवन, पारडी, वाठोडा, इतवारी, गांधीबाग, मानेवाडा, रविनगर येथे भोजनदान केले जात आहे.
-------------
श्रीकृष्णार्पण सेवा संस्थेतर्फे महापौरांचा सत्कार
नागपूर : श्रीकृष्णार्पण सेवा संस्थेच्या वतीने गांधीबाग उद्यानात महापौर दयाशंकर तिवारी यांचा सत्कार भागवताचार्य पं. नंदकिशोर पाण्डेय यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुभाष कुलश्रेष्ठ, मीना कुलश्रेष्ठ, सुभाष मिश्रा, ज्ञानवती साहू, सोहनलाल साहू, डॉ. विजय तिवारी, मंजू शर्मा, शीला गुप्ता, महेंद्र चौकसे, संगीता चौकसे, नितीन चौकसे, विधि चौकसे, पंकज महाजन, प्रीति महाजन, गिरधर राय, जया राय, रचना महाजन, पं. कृष्णमुरली पाण्डेय उपस्थित होते.
------------
पं. बच्छराज व्यास यांना नमन
नागपूर : जनसंघाचे माजी अध्यक्ष, अधिवक्ता व कवी पं. बच्छराज व्यास यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सोमवारी त्यांना नमन करण्यात आले. पं. बच्छराज व्यास चौक, महाल येथे त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आ. गिरीश व्यास, ॲड. नचिकेत व्यास, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, बंडू राऊत, कविता इंगळे, रोशन राहाटे, केशवभाऊ भिवापुरकर, मनोज तिवारी, अजय टक्कामोरे, आशीष भुते उपस्थित होते.
------------
सिंधी युवा फोर्सतर्फे प्लाज्मा दान शिबिर
नागपूर : कोरोना संसर्गाचा प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर उपचारात प्लाज्मा थेरपी कारगर ठरत आहे. त्याच हेतूने सिंधी युवा फोर्सच्या वतीने प्लाज्मा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष गुड्डू केवलरामानी, गिरधर वाधवानी, टेकचंद सेतीया, नरेश दुलानी, कमलजीत सिंह मंगत, राजेश लालवानी, विकास हरवानी, दीपक क्रिशनानी, जवाहर टेकचंदानी, संतोष चावला, मनोहर झांबानी, रोहित कृपलानी, विलास हेमराजानी, संतोष तोतवानी, राजेश वासवानी, रोहित चौधरी, दीपक वाधवानी, अमर कटारिया यांनी प्लाज्मा डोनेट केले.
...........