महिला व बालकल्याण विभागातर्फे अंजली निंबाळकर यांचा सन्मान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:22 AM2020-11-26T04:22:18+5:302020-11-26T04:22:18+5:30

नागपूर : माहिला व बाल विकास विभागातर्फे कोविड काळात उत्तम कार्य केलेल्या राज्यातील पाच अधिकाऱऱ्यांचा सन्मान मुंबईत करण्यात ...

Anjali Nimbalkar honored by Women and Child Welfare Department () | महिला व बालकल्याण विभागातर्फे अंजली निंबाळकर यांचा सन्मान ()

महिला व बालकल्याण विभागातर्फे अंजली निंबाळकर यांचा सन्मान ()

Next

नागपूर : माहिला व बाल विकास विभागातर्फे कोविड काळात उत्तम कार्य केलेल्या राज्यातील पाच अधिकाऱऱ्यांचा सन्मान मुंबईत करण्यात आला. नागपुरातील शासकीय मुलींचे बालगृह तथा शासकीय सरस्वती महिला वसतिगृह, काटोल रोड या संस्थेच्या अधीक्षिका अंजली निंबाळकर यांचा महिला व बालकल्याण विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. संपूर्ण कोविड लॉकडाऊन दिवसात मुलींचे बालगृह मधील सर्व मुलींचे व मतिमंद महिलांचे आरोग्य दोन्ही संस्थेच्या कर्मचारी वर्गाचे मदतीने उत्तमरीत्या जपण्यात आले. कार्यालयीन कर्मचारी व येणारे अभ्यागत यांचेसोबत सोशल डिस्टसिंग ठेवत कोरोना दिवसात प्रवेशिताना देण्यात येणारे अन्न त्यांचे दैनंदिन जीवन यात शासकीय मार्गदर्शिकेचे पालन करुन सर्वाना सुरक्षित ठेवले. याची दखल घेत अंजली निंबाळकर यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी विभागाच्या सचिव कुंदन, आयुक्त यशोद, उपायुक्त रवि पाटील, मनिषा बिरारीस, ज़िल्हा महिला बाल कल्याण अधिकारी अपर्णा कोल्हे उपस्थित होत्या.

Web Title: Anjali Nimbalkar honored by Women and Child Welfare Department ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.