अण्णा गँगने लावला व्यापाºयांना चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:50 AM2017-10-26T01:50:19+5:302017-10-26T01:50:32+5:30
अण्णा गँगच्या टोळीतील एक सदस्य व्यापाºयांना लाखो रुपयाचा चुना लावून फरार झाला. चेक बाऊन्स झाल्यावर व्यापाºयांना खरा प्रकार लक्षात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अण्णा गँगच्या टोळीतील एक सदस्य व्यापाºयांना लाखो रुपयाचा चुना लावून फरार झाला. चेक बाऊन्स झाल्यावर व्यापाºयांना खरा प्रकार लक्षात आला. त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात ९ व्यापाºयांना १७ लाख रुपयाने फसवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
व्यंकटेश सुब्रमण्यम (४४) रा. बँक कॉलनी तिरुवरम तामिळनाडू असे आरोपीचे नाव आहे. सुब्रमण्यम ऊर्फ अण्णा जुलै महिन्यात नागपुरात आला. तो बारसेनगर येथे भाड्याने राहू लागला. त्याने लकडगंज पोलीस ठाण्यासमोरील एका अपार्टमेंटमध्ये भंडारी इंटरप्रायजेस नावाने कार्यालय आणि गोदाम सुरू केले. ही जागा मुकेश वर्मा नावाच्या व्यक्तीची होती. दुकानाच्या माध्यमातून तो व्यापाºयांना आपल्या जाळ्यात ओढू लागला. त्याने बहुतांश हार्डवेअर व्यापाºयांनाच जाळ्यात ओढले.
प्रशांत इंगळे रा. जानकीनगर हे एक पीडित व्यापारी आहेत. त्यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. सुब्रमण्यमने प्रशांत यांना फोन करून त्यांना दगड आणि प्लायवूडला जोडण्यासाठी वापरण्यात येणाºया एरललाईट मोठ्या प्रमाणावर खरेदी करायचे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने स्वत:चा परिचय दिनेश जैन म्हणून दिला. तसेच प्रशांत यांना कोटेशन पाठवण्यास सांगितले. सुब्रमण्यमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रशांत यांनी एरललाईट कंपनीच्या प्रतिनिधीला विश्वासात घेऊन १ लाख १० हजार रुपये किमतीच्या वस्तूची खरेदी केली. वस्तू उपलब्ध झाल्यावर सुब्रमण्यमने १६ आणि १८ आॅक्टोबर रोजी चेक दिले. सुब्रमण्यमने प्रशांत प्रमाणेच सचिन नायसे, पंकज डालमिया, अंकित डालमिया, राजेश वधावन, भावेश कोठारी, शैलेश अग्रवाल, निखील जैन आणि प्रकाश नावाच्या व्यापाºयांशी सुद्धा संपर्क केला. त्यांच्याकडून सुद्धा प्लायवूड व हार्डवेअरचे सामान मोठ्या प्रमाणावर खरेदी करायचे असल्याचे सांगितले. त्यांनी सुद्धा सामान उपलब्ध करून दिले.
फसवणुकीची रक्कम कोट्यवधीत
सुब्रमण्यम ऊर्फ अण्णाने योजनाबद्धरीतीने व्यापºयांना फसवले. शहरातील अनेक भागातील व्यापाºयांना त्याने फसवल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत फसवणुकीची रक्कम कोट्यावधीत जाण्याची शक्यता आहे. सुब्रमण्यम याच्यासोबत एक महिला आणि आणखी चार-पाच लोक होते. त्यांचाही शोध घेतला जात आहे.