संपकºयांवर ऐवजदारांचा अंकु श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:33 AM2017-09-11T01:33:32+5:302017-09-11T01:34:14+5:30

गेल्या सहा महिन्यात ‘आपली बस’ची चाके चारवेळा थांबली. शहर परिवहनाची जबाबदारी असलेल्या महापालिका प्रशासनाची यामुळे चांगलीच कोंडी झाली.

Annexure of contacts on contacts | संपकºयांवर ऐवजदारांचा अंकु श

संपकºयांवर ऐवजदारांचा अंकु श

Next
ठळक मुद्देसंपाला पर्याय : परिवहन समितीचा नवा फॉर्म्युला

राजीव सिंग।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या सहा महिन्यात ‘आपली बस’ची चाके चारवेळा थांबली. शहर परिवहनाची जबाबदारी असलेल्या महापालिका प्रशासनाची यामुळे चांगलीच कोंडी झाली. भविष्यात अशा घटनांना आळा बसावा यासाठी संप करणाºया बसचालक व वाहकांवर अंकुश ठेवण्यासाठी परिवहन समिती नवा फॉर्म्युला शोधत आहे. त्यानुसार महापालिकेत कार्यरत असलेल्या ऐवजदारांना अर्धवेळ धर्तीवर बसचालक व वाहकांचे काम देणार आहे. त्यामुळे बस कर्मचाºयांनी संप पुकारलाच तर ऐवजदार बस सुरू ठेवणार आहे. अशा ६० ऐवजदारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर शहर बसमध्ये काम दिले जाणार आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी ५० तासांच्या संपानंतर परिवहन समिती व परिवहन विभागातील अधिकाºयांत संपावर अंकु श ठेवण्यासाठी मंथन झाले. महापालिकेच्या आरोग्य विभागात चार हजाराहून अधिक ऐवजदार कार्यरत आहेत. दुपारच्या पाळीनंतर ते रिकामे होतात. दुसरीकडे काम करतात. त्यांना शहर बस सेवेत समावून घेतल्यास बस कर्मचाºयांच्या संपाचा सामना करणे शक्य होणार आहे.
परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी नवीन फॉर्म्युला आणण्याला दुजोरा दिला आहे. ज्या ऐजदारांना वाहन चालविण्याचा अनुभव असून शिक्षित आहेत त्यांचेच अर्ज स्वीकारले जात आहेत. प्रभागात कार्यरत असलेल्या अशा ऐवजदारांची यादी मागविण्यात आली आहे. ६० ऐवजदारांनी अर्धवेळ काम करण्याला सहमती दर्शविली आहे. त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर दुपारी ३ नंतर दुसºया पाळीत त्यांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती कुक डे यांनी दिली.
अधिकृत संघटना संपुष्टात आणण्याची तयारी
शहर बसमध्ये कार्यरत कर्मचाºयांच्या विविध संघटना आहेत. त्यांना बससेवेशी काही देणेघेणे नाही. राजकीय पक्ष आपली पोळी भाजण्यासाठी चालक व वाहकांना चिथावणी देतात व संप घडवून आणतात. अशा परिस्थितीत चालक -वाहकांतील काही लोकांना सोबत घेऊ न पर्यायी व्यवस्था निर्माण क रण्यात येणार आहे. यामुळे परिवहन विभागाला मदत होईल. परंतु या संदर्भात स्पष्ट बोलण्यास कुणीही तयार नाही.

Web Title: Annexure of contacts on contacts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.