‘आवाज लेकीचा’ संस्थेचा वर्धापन दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:19 AM2020-12-03T04:19:00+5:302020-12-03T04:19:00+5:30
रामटेक : ‘आवाज लेकीचा’ बहुउद्देशीय संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रामटेक शहरात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात तरुणी, महिला व ...
रामटेक : ‘आवाज लेकीचा’ बहुउद्देशीय संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रामटेक शहरात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात तरुणी, महिला व मुलांवर हाेणारे अत्याचार तसेच समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला समुपदेशन केंद्राच्या प्रमुख दीपा चव्हाण हाेत्या, तर उद्घाटक म्हणून प्रा. ललिता चंद्राते व प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सुरेश साेमकुवर, साहित्यिक गिरीश सपाटे, याेगिता गायकवाड, सरपंच श्रीनंदा धुर्वे उपस्थित हाेत्या. या संस्थेमार्फत लहान मुलांना चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, बलात्कार, लैंगिक शाेषण, माेबाईलचे महत्त्व व परिणाम, त्यापासून स्वत:ला कसे दूर ठेवायचे यासह तरुणी, महिला व लहान मुलांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन व जनजागृती केली जाते. तळागाळातील मुले-मुली सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कसे पुढे येतील, यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. कार्यक्रमाला नगरसेवक दामाेदर धाेपटे, संस्थेच्या अध्यक्ष जया मसराम, सचिव देवानंद नागदेवे, अश्विनी नागपुरे, पीयूष जांभूळकर, सतीश डाेंगरे, आम्रपाली भिवगडे, शुभम दुधबरवे, मयूर टेंभूर्णे, भारती घरजाळे, समीर बाेरकर , साेनू दुधपचारे, अंकित बन्साेड, अश्विन डुंडे, नेहा उरकुडे, नेहा चाैकसे यांच्यासह नागरिक उपस्थित हाेते.