राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 07:55 PM2018-03-15T19:55:03+5:302018-03-15T19:55:18+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची २०१८-१९ या वर्षाकरिताची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अनुभवी तसेच तरुण पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख स्वांत रंजन यांची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये काही नवीन चेहरे समाविष्ट करण्यात आले असून, काही पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची २०१८-१९ या वर्षाकरिताची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अनुभवी तसेच तरुण पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख स्वांत रंजन यांची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये काही नवीन चेहरे समाविष्ट करण्यात आले असून, काही पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रांतातील स्वयंसेवकांना या कार्यकारिणीत संधी देण्याचा प्रयत्न झाला आहे.
मूळचे नागपूर येथील डॉ. मनमोहन वैद्य यांच्याकडे अखिल भारतीय प्रचार प्रमुख ही जबाबदारी होती. तर मूळचे कर्नाटकातील बंगळुरू येथील मुकुंद सी.आर. यांच्याकडे अखिल भारतीय सहबौद्धिक प्रमुख ही जबाबदारी होती. त्यांच्याकडे आता सहसरकार्यवाहपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. वैद्य यांच्या जागी अरुण कुमार तर मुकुंद सी.आर. यांच्या जागी सुनील मेहता यांची नियुक्ती झाली आहे. रमेश पप्पा यांच्याकडे सहसंपर्कपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी
सरसंघचालक : डॉ. मोहन भागवत
सरकार्यवाह : भय्याजी जोशी
सहसरकार्यवाह : सुरेश सोनी, डॉ. कृष्णगोपाल, दत्तात्रेय होसबळे, व्ही. भागय्या, डॉ. मनमोहन वैद्य, सी.आर.मुकुंद
बौद्धिक प्रमुख : स्वांत रंजन
सहबौद्धिक प्रमुख : सुनील मेहता
शारीरिक प्रमुख : सुनील कुळकर्णी
सहशारीरिक प्रमुख : जगदीश प्रसाद
संपर्क प्रमुख : अनिरुद्ध देशपांडे
सहसंपर्क प्रमुख : सुनील देशपांडे, रमेश पप्पा
सेवा प्रमुख : पराग अभ्यंकर
सहसेवा प्रमुख : राजकुमार मटाले
व्यवस्था प्रमुख : मंगेश भेंडे
सहव्यवस्था प्रमुख : अनिल ओक
प्रचार प्रमुख : अरुण कुमार
सहप्रचार प्रमुख : नरेंद्र कुमार ठाकूर
प्रचारक प्रमुख : सुरेश चंद्र
सहप्रचारक प्रमुख : अरुण जैन, अद्वैत चरण दत्ता
कुटुंब प्रबोधन प्रमुख : सुब्रमण्यम
अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य :
शंकर लाल, डॉ. दिनेश कुमार, इंद्रेश कुमार, सुनील पाद गोस्वामी, अशोक बेरी, गुणवंतसिंह कोठारी, मधुभाई कुलकर्णी, सुहास हिरेमठ
अखिल भारतीय कार्यकारिणी निमंत्रित सदस्य :
हस्तीमल, विनोद कुमार, जे.नंदकुमार, सुनील पद गोस्वामी, सेतुमाधवन, गौरीशंकर चक्रवर्ती, शरद ढोले, सुब्रमण्यम, रवींद्र जोशी, श्याम प्रसाद, सांकलचंद बागरेचा, दुर्गाप्रसाद, अलोक, रामदत्त, प्रदीप जोशी, बालकृष्ण त्रिपाठी