आणखी २३७५ बाधित, १७ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:08 AM2021-04-15T04:08:31+5:302021-04-15T04:08:31+5:30
सावनेर/ काटोल/ कळमेश्वर/ मौदा/ नरखेड/ कुही : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा ग्राफ वाढतीवर आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात बुधवारी ...
सावनेर/ काटोल/ कळमेश्वर/ मौदा/ नरखेड/ कुही : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा ग्राफ वाढतीवर आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात बुधवारी आणखी २३७५ रुग्णांची भर पडली, तर १७ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ग्रामीण भागातील बाधित रुग्णांची संख्या ७२,०६८ झाली आहे. आतापर्यंत १३१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी ११४५ रुग्ण बरे झाले. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २३,६१८ इतकी झाली आहे.
सावनेर तालुक्यात ४७६ रुग्णांची नोंद झाली, तर दोघांचा मृत्यू झाला. सावनेर शहरात १४५, तर ग्रामीणमध्ये ३३१ रुग्णांची भर पडली.
कळमेश्वर तालुक्यात ३११ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील २६ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात मोहपा येथे सर्वाधिक ५३ रुग्णांची नोंद झाली.
कुही तालुक्यात ४२ रुग्णांची नोंद झाली. कुही येथील कोविड केअर सेंटरवर ८३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले. मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ८२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सध्या तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २२०६ इतकी झाली आहे.
काटोल तालुक्यात ६७ रुग्णांची भर पडली. यात काटोल शहरातील ४७, तर ग्रामीण भागातील २० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागामध्ये कोंढाळीत सर्वाधिक १४ रुग्णांची नोंद झाली. नरखेड तालुक्यात ११३ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील १७, तर ग्रामीण भागातील ९६ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १०२८, तर शहरात २०३ झाली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावअंतर्गत ५८, जलालखेडा (२४), मेंढला (४), तर मोवाड येथे १० रुग्णांची नोंद झाली.
रामटेक तालुक्यात ८० बाधित
रामटेक तालुक्यात ८० रुग्णांची भर पडली. यात शहरातील ४२, तर ग्रामीण भागातील ३८ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ३२८६ झाली आहे. यातील १६९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १५९२ इतकी आहे.