पुन्हा एक दिवाळी स्पेशल नागपूरमार्गे धावणार; सनतनगर-रायपूर-सनतनगर, दिवाळी, छटपूजेसाठी जाणाऱ्यांना दिलासा

By नरेश डोंगरे | Published: October 27, 2024 11:05 PM2024-10-27T23:05:29+5:302024-10-27T23:05:36+5:30

दिवाळी आणि छटपूजेसाठी आपापल्या गावात जाण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिलासा दिला आहे. ३१ ऑक्टोबरपासून सनतनगर-रायपूर-सनतनगर ही दिवाळी स्पेशल ट्रेन नागपूर मार्गे धावणार आहे.

Another Diwali special will run via Nagpur; | पुन्हा एक दिवाळी स्पेशल नागपूरमार्गे धावणार; सनतनगर-रायपूर-सनतनगर, दिवाळी, छटपूजेसाठी जाणाऱ्यांना दिलासा

पुन्हा एक दिवाळी स्पेशल नागपूरमार्गे धावणार; सनतनगर-रायपूर-सनतनगर, दिवाळी, छटपूजेसाठी जाणाऱ्यांना दिलासा

नागपूर : दिवाळी आणि छटपूजेसाठी आपापल्या गावात जाण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिलासा दिला आहे. ३१ ऑक्टोबरपासून सनतनगर-रायपूर-सनतनगर ही दिवाळी स्पेशल ट्रेन नागपूर मार्गे धावणार आहे.

२४ कोच असलेल्या या ट्रेनमध्ये २ एसएलआर/ एसएलआरडी, २ सामान्य, ११ शयनयान, ७ एसीथ्री आणि एसटी टूचे दोन कोच राहणार आहे. ०७०२३ ही गाडी ३१ ऑक्टोबर, ७ आणि १४ नोव्हेंबरला सनतनगर येथून रात्री ९ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८:२० वाजता ती नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचेल. येथून पुढे निघाल्यानंतर सकाळी १०:२५ वाजता गोंदिया, ११:८ वाजता राजनांदगाव, १२:३० वाजता दुर्ग आणि दुपारी १:४५ वाजता रायपूरला पोहोचेल.

त्याचप्रमाणे १, ८ तसेच १५ नोव्हेंबरला ०७०२४ रायपूर सनतनगर ही गाडी रायपूर रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ४:४५ वाजता सुटेल. ती दुर्गला ५:४० वाजता, राजनांदगावला सायंकाळी ६ वाजता, ७:३७ वाजता गोंदिया आणि रात्री ९:३५ वाजता नागपूरला पोहोचेल. येथून दुसऱ्या दिवशी सकाळी ७:३५ वाजता सिकंदराबाद आणि सकाळी ९:३० वाजता सनतनगरला पोहोचेल.

या स्पेशल ट्रेनमुळे दिवाळी, छटपूजेसाठी गावाला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल, असा विश्वास दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Web Title: Another Diwali special will run via Nagpur;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.