मुंबईसाठी नागपुरातून सकाळी आणखी एक विमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 12:02 IST2020-10-06T12:01:39+5:302020-10-06T12:02:02+5:30
Nagpur News Flight डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १६ ऑक्टोबरपासून इंडिगो एअरलाईन्स मुंबई-नागपूर ही नवीन विमानसेवा सुरु करीत आहे.

मुंबईसाठी नागपुरातून सकाळी आणखी एक विमान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १६ ऑक्टोबरपासून इंडिगो एअरलाईन्स मुंबई-नागपूर ही नवीन विमानसेवा सुरु करीत आहे. ६ ई ५३४ हे विमान मुंबईवरून नागपूरला सायंकाळी ५ वाजता पोहोचेल. यानंतर नागपूर विमानतळावर नाईट पार्किंग करीत दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता मुंबईसाठी रवाना होईल. या सेवेसाठी एअरबस ३२० चा उपयोग केला जाईल. याची प्रवासी क्षमता १८० इतकी आहे. यापूर्वी १६ सप्टेंबरपासून दिल्लीसाठी उडणाऱ्या एका विमानाचे नागपुरात नाईट पार्किंग होत आहे.
आता मुंबईसाठी आणखी एक विमान सुरू होत असल्याने एकूण चार उड्डाणे होतील. सध्या नागपूर-मुंबईसाठी गो एअरची जी ८ -१४१ सकाळी ८ वाजता, इंडिगोची ६ ई २९७ दुपारी १२.१५ वाजता आणि ६ ई ६४०४ रात्री ९.०५ वाजता उपलब्ध आहे. १६ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या इंडिगोचे विमान शेड्यूलमध्ये दाखविले जात आहे.