भूमाफिया ग्वालबन्सीला आणखी एक दणका

By admin | Published: May 14, 2017 02:12 AM2017-05-14T02:12:46+5:302017-05-14T02:12:46+5:30

कोराडी मार्गावरील मौजा झिंगाबाई टाकळी येथील तवक्कल हाऊसिंग सोसायटीच्या जागेवर भूमाफीया दिलीप ग्वालबन्सी याने झोपडपट्टी वसविली होती.

Another gang of landmistress Gwalbansi | भूमाफिया ग्वालबन्सीला आणखी एक दणका

भूमाफिया ग्वालबन्सीला आणखी एक दणका

Next

नासुप्रची कारवाई : ४० झोपड्यांवर चालला बुलडोझर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोराडी मार्गावरील मौजा झिंगाबाई टाकळी येथील तवक्कल हाऊसिंग सोसायटीच्या जागेवर भूमाफीया दिलीप ग्वालबन्सी याने झोपडपट्टी वसविली होती. येथील १६० झोपड्यापैकी १२० झोपड्या गेल्या मंगळवारी हटविण्यात आल्या होत्या. यातील शिल्लक ४० झोपड्या शनिवारी नासुप्रच्या अतिक्रमण विभागाच्या प्रथकाने जमीनदोस्त केल्या.
सकाळी १० च्या सुमारास ३ जेसीबीसह नासुप्रचे पथक सोसायटीच्या जागेवर पोहचले. परंतु झोपडपट्टीधारक ांनी कारवाईला विरोध दर्शविला. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलीस पथक पोहचताच पथकाने अतिक्रमण हटविण्याला सुरुवात केली. यात तीन दोन मजली इमारतींचाही समावेश आहे. अतिक्रमणधारकांना अन्यत्र जाण्याचा सल्ला देण्यात आला. पुन्हा अतिक्रमण केल्यास कारवाईचा इशारा नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी दिला.
गेल्या मंगळवारी नासुप्र व महापालिकेच्या पथकाने १२० झोपड्या हटविल्या होत्या. परंतु रात्र झाल्याने कारवाई थाबंविण्यात आली होती. यामुळे ४० झोपड्या शिल्लक होत्या. या जागेवर गेल्या १० ते १२ वर्षापूर्वी ग्वालबन्सी यांने ही झोपडपट्टी वसविली होती. काहींनी पक्की घरे उभारली होती. या संदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार सदर अतिक्रमण काढण्यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने येथील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नासुप्र व महापालिकेच्या पथकांनी अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. नासुप्रचे अधिकारी प्रमोद धनकर, विभागीय अधिकारी अनिल राठोड, पथक प्रमुख वसंत कन्हेरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

काही गेले ; काहींचा ठिय्या कायम
नासुप्र व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गेल्या मंगळवारी अतिक्रमण हटविल्यानंतर बहुतांश कुटुंब आपले सामान घेऊ न दुसरीकडे वास्तव्यास गेलेले आहेत. परंतु काही कुटुंब अजूनही तवक्कल सोसायटीच्या जागेवरून हटविण्यात आलेल्या आपल्या घराच्या जागेवर ठाण मांडून आहेत. त्यामुळे मूळ प्लॉटधारकांना आपली जागा ताब्यात कशी घ्यावी, असा प्रश्न पडला आहे.

 

Web Title: Another gang of landmistress Gwalbansi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.