येरखेड्यात डेंग्यूचा आणखी एक बळी, मृत्यू संख्या तीनवर; ग्रामस्थात भितीचे वातावरण
By जितेंद्र ढवळे | Published: September 4, 2023 07:00 PM2023-09-04T19:00:25+5:302023-09-04T19:00:43+5:30
जुगल यांच्या मुलाचा १ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकाही नातेवाइकांना पाठविण्यात आल्या होत्या.
नागपूर : कामठी तालुक्यातील येरखेडा येथे डेंग्यूमुळे आणखी एका रुग्णाचा जीव गेला. जुगल तायडे (२९) असे या डेंग्यू संशयीत मृत रुग्णाचे नाव आहे. गत महिभारात येथे तिघांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. इकडे नागपूर शहरातही डेंग्यू बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जुगल याची प्रकृती ३१ ऑगस्ट रोजी खालावली. त्याला १ सप्टेंबर रोजी कामठी येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर त्याला कुटुंबियांनी नागपूर येथे एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शनिवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
जुगल यांच्या मुलाचा १ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकाही नातेवाइकांना पाठविण्यात आल्या होत्या. मात्र त्याच दिवशी त्यांची प्रकृती आणखी ढासळली. सध्या येरखेडा गावात डेंग्यू संशीयत रुग्णांची संख्या ५० हून अधिक आहे.