एकाच्या बदलीवर दुसऱ्याचा आक्षेप! जिल्हा परिषदेत समुपदेशनाने सर्वसाधारण बदल्या
By गणेश हुड | Published: May 11, 2023 07:42 PM2023-05-11T19:42:17+5:302023-05-11T19:43:42+5:30
गेल्या मंगळवारी बदल्यांची प्रक्रीया सुरू झाली. तीन दिवसात १२३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशाने करण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेत सर्वसाधारण बदल्याची प्रक्रीया सुरू आहे. समुपदेशाने या बदल्या होत असल्या तरी काही प्रकरणात कर्मचारीच बदलीवर आक्षेप घेत असल्याचे प्रकार घडत आहे. तर काही प्रकरणात कर्मचारी संघटनेच्या वतीनेही आक्षेप नोंदविण्यात आले. अशा प्रकरणात आलेल्या आक्षेपांची शहानिशा करून नियमात बसत असेल तरच बदली करण्याची भूमिका जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी घेतली आहे.
गेल्या मंगळवारी बदल्यांची प्रक्रीया सुरू झाली. तीन दिवसात १२३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशाने करण्यात आल्या. पहिल्या दिवशी मंगळचारी आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य सेवक महिला , औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक पुरुष , आरोग्य सहाय्यक पुरुष , आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य सहाय्यक महिला तर शिक्षण विभागांतर्गत केंद्रप्रमुख, कनिष्ठ व्याख्याता, विस्तार अधिकारी शिक्षण अशा ५६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
गुरुवारी सात विभागातील समुपदेशनाने बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये वित्त विभागावातील सहाय्यक लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखा अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी, आणि कनिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी यांचा समावेश होता तर लघु पाटबंधारे विभाग यामध्ये शाखा अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आदींचा समावेश होता.
तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत कनिष्ठ अभियंता या सोबतच बांधकाम विभागांतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य, अभियांत्रिकी सहाय्यक यांची बदली करण्यात आली यानंतर पशुसंवर्धन विभागांतर्गत सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक ,पट्टीबंधक यांच्या तर महिला आणि बालकल्याण विभागाअंतर्गत पर्यवेक्षिका पदाच्या बदल्या करण्यात आल्या . कृषी विभागांतर्गत विस्तार अधिकारी कृषी यांची बदली समुपदेशनाने करण्यात आली एकूण२७ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
गुरुवारी सामान्य प्रशासन विभागातील ५६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी,विस्तार अधिकारी सांख्यिकी, वरिष्ठ सहायक लिपिक, कनिष्ठ सहायक लिपिक या पदांच्या समुपदेशनाने बदल्या करण्यात आल्या .समुपदेश प्रक्रिया जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकडडे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, सभापती राजकुमार कसबे तसेच सामान्य प्रशासन विभागाचे विभाग प्रमुख विपुल जाधव आदींच्या उपस्थितीत ही प्रक्रीया सुरू आहे.