मेट्रो स्टेशनवर अ‍ॅन्टी कोरोना औषधांची फवारणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:22 AM2020-03-15T00:22:48+5:302020-03-15T00:23:55+5:30

महामेट्रोतर्फे कोरोना व्हायरसच्या प्रकोपाकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहे. त्याअंतर्गत मेट्रो स्टेशनवर विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षेसाठी महामेट्रो प्रशासन सज्ज असून कोरोनामुळे आणखी काळजी बाळगली जात आहे.

Anti-Corona drug spray at metro station | मेट्रो स्टेशनवर अ‍ॅन्टी कोरोना औषधांची फवारणी 

मेट्रो स्टेशनवर अ‍ॅन्टी कोरोना औषधांची फवारणी 

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : महामेट्रोतर्फेकोरोना व्हायरसच्या प्रकोपाकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहे. त्याअंतर्गत मेट्रो स्टेशनवर विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षेसाठी महामेट्रो प्रशासन सज्ज असून कोरोनामुळे आणखी काळजी बाळगली जात आहे.
शनिवारी सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन, जयप्रकाशनगर, खापरी आणि लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनवर विशेष अभियान राबवून स्टेशन परिसराची साफसफाई आणि अ‍ॅन्टी कोरोना औषधांची फवारणी करण्यात आली. या कार्यात चार चमू कार्यरत होती. मेट्रो स्टेशन येथे कोरोना व्हायरसवर प्रवाशांना जागरूक करण्यासोबतच सुरक्षेसंबंधी बोर्ड तसेच बॅनर आणि पोस्टर लावण्यात आले आहेत. तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये उद्घोषकाद्वारे प्रवाशांना माहिती देण्यात येत आहे. त्यातच आणखी एक टप्पा पुढे जात शनिवारी विशेष फवारणी अभियान राबविण्यात आले.
मेट्रो स्टेशनचे प्रवेशद्वार, सीडी, एक्सलेटर, लिफ्ट, प्रसाधनगृह ते तिकीट काऊंटर आणि परिसरमध्ये औषधांची फवारणी करण्यात आली. स्टेशनवर कार्यरत कर्मचाऱ्यांकरिता २०० मास्क आणि हातमोज्याचे वितरण करण्यात आले. प्रवाशांना स्वच्छता ठेवण्यासंबंधीची माहिती देण्यात आली. महामेट्रो प्रशासनाकडून विशेष अभियान निरंतर सुरू राहणार आहे. अ‍ॅन्टी कोरोना स्टेरिगार्ड औषधाची फवारणी विशेष प्रकारचे कपडे आणि मास्कद्वारे करण्यात आली. मेट्रो रेल्वेमध्ये स्वच्छता ठेवण्याकरिता कर्मचारी कार्यरत आहे. महाव्यवस्थापक सुधाकर उराडे यांच्या नेतृत्वात विशेष अभियान राबविण्यात येत आहे.

Web Title: Anti-Corona drug spray at metro station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.