कोविड निधीतून घेतल्या अँटी रॅबीज लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:07 AM2021-06-11T04:07:27+5:302021-06-11T04:07:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. कोरोनासाठी देण्यात आलेल्या ...

Anti-rabies vaccine from Covid Fund | कोविड निधीतून घेतल्या अँटी रॅबीज लस

कोविड निधीतून घेतल्या अँटी रॅबीज लस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. कोरोनासाठी देण्यात आलेल्या एसडीआरएफ निधीतून अँटी रॅबीज लस खरेदी करण्यात आल्या, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस व नगरसेविका आभा पांडे यांनी केला आहे. मनपाने एकाच बिलाचा निधी केंद्राच्या एनएचएम व राज्याच्या एसडीआरएफ फंडातून दिला आहे. मनपा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अन्यथा न्यायालयात दाद मागू, अशी भूमिका पांडे यांनी पत्रपरिषेददरम्यान मांडली.

आभा पांडे यांनी सादर केलेल्या दस्तावेजांनुसार ५७ लाख ४८ हजार ५७० रुपयांची पीपीई किट खरेदी करण्यात आली. हा निधी एनएचएमसोबतच एसडीआरएफ फंडातून देण्यात आला. सरकारने जो निधी केवळ कोरोनासाठी खर्च करायला दिला होता, तो मनपाने दुसऱ्या ठिकाणी खर्च केला. खरेदीदेखील अधिक दरांनी झाली आहे. खरेदीसाठी गठित समितीचे मतदेखील विचारण्यात आले नाही. मनपाने खासगी रुग्णालयांना पीपीई किट जास्तीत जास्त ५०० रुपयांमध्ये घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, खुद्द मनपाने ८४० रुपयांत पीपीई किट घेतली. इन्फ्रारेड थर्मामीटरची खरेदीदेखील अधिक दराने झाली. ५७५ रुपयांचे पल्स ऑक्सिमीटर १ हजार ४४५, १ हजार ७१२ व २ हजार ४०० रुपयांत खरेदी करण्यात आल्याचा आरोप आभा पांडे यांनी लावला.

कोरोना पॉझिटिव्ह अधिकाऱ्याची स्वाक्षरी

काही फायलींमध्ये तर अशा अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे, जे त्यावेळी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने सुटीवर होते. अधिकारी पॉझिटिव्ह असताना कार्यालयात गेले होते की फायली त्यांच्या घरी पाठविण्यात आल्या होत्या, असा प्रश्न पांडे यांनी उपस्थित केला.

Web Title: Anti-rabies vaccine from Covid Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.