अनुपकुमार यांनी स्वीकारला सहपोलीस आयुक्तांचा पदभार
By admin | Published: August 5, 2014 01:02 AM2014-08-05T01:02:00+5:302014-08-05T01:02:00+5:30
शहरातील गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण करणारे सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना यांना आज निरोप देण्यात आला. नवनियुक्त सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह यांनी त्यांच्या रिक्त पदाचा
संजय सक्सेना यांना निरोप
नागपूर : शहरातील गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण करणारे सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना यांना आज निरोप देण्यात आला. नवनियुक्त सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह यांनी त्यांच्या रिक्त पदाचा कार्यभार आज सायंकाळी स्वीकारला.
सक्सेना यांची फोर्स-वनचे आयजी म्हणून मुंबईला बदली झाली आहे. त्यांच्या जागी नक्षलविरोधी अभियानाचे उपमहानिरीक्षक अनुपकुमार सिंह यांची नियुक्ती झाली आहे.
आज सायंकाळी ५ च्या सुमारास सक्सेना यांनी आपल्या पदाची सूत्रे अनुपकुमार यांच्याकडे सोपविली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना शहरातील गुन्हेगारीचा संक्षिप्त आढावा घेतला. नवे सहपोलीस आयुक्त अनुपकुमार यांनी गुन्हेगारीला आळा घालण्याला आपण प्राधान्य देऊ, असे मत व्यक्त केले.
विशेष म्हणजे, अनुपकुमार गेल्या सहा वर्षांपासून नागपूर शहरात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त (दक्षिण प्रभाग) जबाबदारी सांभाळली आहे. २०१२ मध्ये त्यांना नक्षलविरोधी अभियानाचे उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. आता परत ते सहआयुक्त म्हणून रुजू झाले.(प्रतिनिधी)