आपली बस कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून वेतन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 09:21 PM2020-09-30T21:21:28+5:302020-09-30T21:22:45+5:30

कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता ‘आपली बस’ सेवा मार्च २०२० पासून बंद आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना सहा महिन्यापासून वेतन नसल्याने ३ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Apali bus staff has not been paid for six months | आपली बस कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून वेतन नाही

आपली बस कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून वेतन नाही

Next
ठळक मुद्देउपासमारीची वेळ : बस सुरू करून वेतन देण्याची शिवसेनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता ‘आपली बस’ सेवा मार्च २०२० पासून बंद आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना सहा महिन्यापासून वेतन नसल्याने ३ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनलॉकमध्ये एसटी बससेवा, खासगी बस, व्यवसाय सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत आपली बससेवा सुरू करावी. अशी मागणी मनपातील शिवसेनेचे गटनेते किशोर कुमेरिया यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
दरम्यान, रेशीमबाग येथील शिवसेना भवन येथे आपली बसचे कंडक्टर, चालक व कर्मचाऱ्यांची बैठक झाली. यात सहा महिन्यांचे थकीत वेतन, बससेवा सुरू करणे, बोनस आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी युनिटीचे शेखर आदमाने यांनी कर्मचाऱ्यांना आठ दिवसात पीएलचे पैसे व बोनस देण्याला सहमती दर्शविली.
बससेवा बंद असल्याने कामगार, नोकरदार व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जादाचे पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. याचा विचार करता प्रशासनाने तातडीने बससेवा सुरू करावी, अशी मागणी किशोर कुमेरिया यांच्यासह उपस्थितांनी केली.

Web Title: Apali bus staff has not been paid for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.