मनपा-ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे आवाहन; चला करूया विजेची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 10:56 AM2019-08-18T10:56:58+5:302019-08-18T10:57:23+5:30
आपली घरे, प्रतिष्ठानांमध्ये सुरू असलेले अनावश्यक वीज दिवे दररोज किमान एक तासासाठी बंद ठेवा, असे आवाहन महापालिका कर्मचारी आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी केले.
ऑनलाईन लोकमत
नागपूर : आज बचत केली नाही तर भविष्यात वीज संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे वेळीच सावध व्हा, पाणी आणि विजेचे महत्त्व ओळखा. या दोन्ही वस्तूंची बचत करा. इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करा. आपली घरे, प्रतिष्ठानांमध्ये सुरू असलेले अनावश्यक वीज दिवे दररोज किमान एक तासासाठी बंद ठेवा, असे आवाहन महापालिका कर्मचारी आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी केले.
पौर्णिमा दिनानिमित्त धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या आग्याराम देवी चौक परिसरात जनजागृती करण्यात आली. महापालिका व आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्यावतीने प्रत्येक पौर्णिमेला कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तत्कालीन महापौर तथा आमदार प्रा. अनिल सोले यांनी पौर्णिमा दिवसाची संकल्पना मांडली.
शुक्रवारी आग्याराम देवी मंदिर चौकात महापौर नंदा जिचकार, मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनात पौर्णिमा दिन जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. माजी महापौर व भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यावेळी उपस्थित होते.
मनपाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एस. मानकर आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात कनिष्ठ अभियंता दिलीप वंजारी, सुनील नवघरे यांच्या उपस्थितीत जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, बिष्णुदेव यादव, कार्तिकी कावळे, प्रिया यादव, शांतनु शेळके, आयुष शेळके या स्वयंसेवकांनी वीज बचतीचे महत्त्व पटवून सांगितले आणि अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनी याला प्रतिसाद दिला.