४ डिसेंबरला हजर व्हा, आमदार राणा यांना समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 01:09 AM2020-11-03T01:09:53+5:302020-11-03T01:10:13+5:30
MLA Ravi Rana : मतदार सुनील खराटे यांनी डिसेंबर-२०१९ मध्ये ही याचिका दाखल केली आहे.
Next
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक रद्दच्या याचिकेप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांना समन्स बजावून येत्या ४ डिसेंबर रोजी हजर होण्याचा आदेश दिला. या याचिकेवर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्यासमक्ष सोमवारी सुनावणी झाली.
मतदार सुनील खराटे यांनी डिसेंबर-२०१९ मध्ये ही याचिका दाखल केली आहे. ऑक्टोबर-२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राणा यांनी २८ लाख या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला. निवडणूक खर्च देखरेख समितीच्या चौकशीतही राणा यांनी खर्चाच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे.