‘पेट’चे स्वरूप बदलणार!
By admin | Published: September 4, 2015 02:56 AM2015-09-04T02:56:55+5:302015-09-04T02:56:55+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएचडी नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’चे (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) स्वरूप पुढील वर्षीपासून बदलण्यात येणार आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएचडी नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’चे (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) स्वरूप पुढील वर्षीपासून बदलण्यात येणार आहे. नव्या स्वरूपात दोन पेपर राहणार असून, यात विषयाशी संबंधित प्रश्नपत्रिकेचासमावेश राहणार असल्याची माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
आजच्या तारखेत ‘पेट’ ही सामान्य बुद्धिमत्ता, लॉजिक-रिझनिंग यावर प्रामुख्याने आधारित असते. परंतु पुढील वर्षीपासून दोन पेपर राहतील. पहिला पेपर सामान्य बुद्धिमत्तेचा राहणार असून, दुसरा पेपर हा संबंधित विषयाच्या ‘स्पेशलायझेशन’वर आधारित राहणार आहे. म्हणजेच ज्या विषयात उमेदवाराला ‘पीएचडी’ करायची आहे, त्याच्याशी संबंधित पेपर राहणार आहे. जो उमेदवार पहिल्या पेपरमध्ये उत्तीर्ण होईल, त्यालाच दुसरा पेपर देता येईल, अशी माहिती येवले यांनी दिली.(प्रतिनिधी)