नागपूर आणि रामटेक क्षेत्रासाठी उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया १८ मार्चपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:20 AM2019-03-12T11:20:21+5:302019-03-12T11:21:51+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी १८ मार्चपासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकरी अश्विन मुदगल यांनी दिली.

Application for filing nominations for Nagpur and Ramtek area from March 18 | नागपूर आणि रामटेक क्षेत्रासाठी उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया १८ मार्चपासून

नागपूर आणि रामटेक क्षेत्रासाठी उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया १८ मार्चपासून

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण ४३८२ मतदान केंद्ररामटेक २३४५, नागपूर २०३७, ८२ मतदान केंद्र संवेदनशील

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी १८ मार्चपासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकरी अश्विन मुदगल यांनी दिली.
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार क्षेत्रात मतदानासाठी ४३८२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यात रामटेक मतदारसंघात २३४५ तर नागपूर मतदारसंघात २०३७ मतदार केंद्रे आहेत. यापैकी ८२ मतदार केंद्रे संवेदनशील आहेत. यात ५२ केंद्रे शहरात तर ३० केंद्रे रामटेक लोकसभा मतदार संघात आहेत. या मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त किंवा सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले.

असा आहे कार्यक्रम
१८ मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात
२५ मार्च अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
२६ मार्चला अर्जाची छाननी
२८ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येईल
११ एप्रिलला मतदान
२३ मे रोजी मतमोजणी

निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी
नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल हे नागपूर लोकसभा तर अतिरिक्ति जिल्हाधिकारी श्रीकांत फडके हे रामटेक लोकसभा निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील. यासोबतच प्रत्येक विधानसभेसाठी सहायक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.

नागपूर लोकसभा - अश्विन मुदगल (जिल्हाधिकारी)
नागपूर दक्षिण-पश्चिम - शिरीष पांडे (उपविभागीय अधिकारी नागपूर शहर)
दक्षिण नागपूर - जगदीश कातकर (उपजिल्हाधिकारी-भूसंपादन)
पूर्व नागपूर - शीतल देशमुख (उपजिल्हाधिकारी-भूसंपादन)
मध्य नागपूर - व्ही.बी. जोशी (उपजिल्हाधिकारी-भूसंपादन)
पश्चिम नागपूर - ज्ञानेश भट - उपजिल्हाधिकारी-भूसंपादन
उत्तर नागपूर - सुजता गंधे - उपल्हिाधिकारी राजस्व
रामटेक लोकसभा- श्रीकांत फडके (अतिरिक्त जिल्हाधिकारी)
काटोल - श्रीकांत उंबरकर (उपविभागीय अधिकारी-काटोल)
सावनेर - संजय पवार - (उपविभागीय अधिकारी-सावनेर)
हिंगणा - सूरज वाघमारे- (उपविभागीय अधिकारी-नागपूर-ग्रामीण)
उमरेड - जे.पी. लोंढे -(उपविभागीय अधिकारी-उमरेड)
कामठी - व्ही. सवरंगपत्ते (उपविभागीय अधिकारी-मौदा)
रामटेक - जोगेंद्र कट्यारे (उपविभागीय अधिकारी-रामटेक)

Web Title: Application for filing nominations for Nagpur and Ramtek area from March 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.