पाॅलिटेक्निक प्रवेशासाठी साडे अकरा हजारावर अर्ज; विभागात ५२ महाविद्यालयात १२,५०० जागा 

By निशांत वानखेडे | Published: July 10, 2023 05:46 PM2023-07-10T17:46:04+5:302023-07-10T17:46:24+5:30

विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन नाेंदणी करण्याचे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात येत आहे.

Application for polytechnic admission at eleven and a half thousand 12,500 seats in 52 colleges in the department | पाॅलिटेक्निक प्रवेशासाठी साडे अकरा हजारावर अर्ज; विभागात ५२ महाविद्यालयात १२,५०० जागा 

पाॅलिटेक्निक प्रवेशासाठी साडे अकरा हजारावर अर्ज; विभागात ५२ महाविद्यालयात १२,५०० जागा 

googlenewsNext

नागपूर: तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अभियांत्रिकी पदविका (पाॅलिटेक्निक) चे प्रवेश घेण्यात येत असून ऑनलाईन अर्जप्रक्रियेसाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दहावीनंतर अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमाला माेठे महत्त्व असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल गेल्या काही वर्षांपासून पाॅलिटेक्निककडे वाढला आहे.

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात पाॅलिटेक्नीकच्या ५२ महाविद्यालयांमध्ये १२,५०० च्यावर जागा असून आतापर्यंत ११,५९३ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केला आहे. अर्ज प्रक्रियेचे आणखी ५ दिवस शिल्लक असल्याने अर्ज वाढतील असा अंदाज आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत सीईटी सेलने ऑनलाईन अर्ज नाेंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलाेड करणे, कागदपत्र पडताळणी करून अर्ज निश्चित करणे (ई-स्क्रुटीनी) यासाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २१ जुलै राेजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर हाेणार असून २२ जुलै राेजी प्रवेशाची प्रथम फेरी सुरू हाेणार आहे. विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन नाेंदणी करण्याचे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात येत आहे.

- जिल्ह्यात २० पॉलिटेक्निक काॅलेज, ५४०९ जागा
नागपूर जिल्ह्यात पाॅलिटेक्निकची २० महाविद्यालये आहेत. यामध्ये एक शासकीय तंत्रनिकेतन, एक ऑटाेनाॅमस व इतर खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांचा समावेश आहे. यात एकूण ५ हजार ४०९ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये शासकीय तंत्रनिकेतनच्या ८८२ जागांचा समावेश आहे. दरवर्षी शासकीय संस्थेच्या १०० टक्के जागा भरल्या जातात हे विशेष.

असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक

  • - ऑनलाईन नाेंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलाेड करणे, ई-स्क्रुटीनी - १५ जुलैपर्यंत.
  • - संकेतस्थळावर तात्पुरती गुणवत्ता यादी प्रकाशित करणे - १७ जुलै
  • - यादीमध्ये तक्रार असल्यास सादर करणे - १८ ते १९ जुलै
  • - अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे - २१ जुलै
  • - प्रथम प्रवेश फेरीला सुरुवात - २२ जुलै : कॅप राउंडसाठी प्रवर्गनिहाय जागा प्रदर्शित करणे.
  • - उमेदवारांच्या लाॅगिनमधून पाठ्यक्रम व संस्थांचा पसंतीक्रम भरणे - २३ ते २६ जुलै.
  • - तात्पुरते जागा वाटप प्रदर्शित करणे - २८ जुलै.
  • - मिळालेली जागा स्वीकारणे व महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश २९ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३
  • - दुसरी प्रवेश फेरी - ५ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट.
  • - तिसरी प्रवेश फेरी व सर्व प्रकारचे प्रवेशासाठी अंतिम दिनांक - १८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर

राेजगाराचे महत्त्व असल्याने पाॅलिटेक्निककडे विद्यार्थी व पालकांचा ओढा वाढलेला असून, दरवर्षी प्रवेशाची टक्केवारी वाढत आहे. प्रवेशासाठी ऑनलाइन नाेंदणी करताना विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलाेड करून नाेंदणी करून घ्यावी. - मनाेज डायगव्हाणे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन संस्था.

Web Title: Application for polytechnic admission at eleven and a half thousand 12,500 seats in 52 colleges in the department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर