दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ११ जूनपर्यंत करा अर्ज

By आनंद डेकाटे | Published: May 31, 2024 05:35 PM2024-05-31T17:35:57+5:302024-05-31T17:36:54+5:30

Nagpur : परिक्षेसाठी ३१ मे २०२४ पासून ऑनलाईन पद्धतीने आवेदन होणार सुरु

Apply for the 10th supplementary examination by 11th June | दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ११ जूनपर्यंत करा अर्ज

Apply for the 10th supplementary examination by 11th June

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा (इयत्ता १०वी) जुलै-ऑगष्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार आहेत. या परिक्षेसाठी ३१ मे २०२४ पासून ऑनलाईन पद्धतीने आवेदन करता येणार असून ११जून अंतिम मुदत असणार आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय मंडळाच्या सहायक सचिव कल्पना लांडे यांनी कळविले आहे.

१० वी चा निकाल २७ मे २०२४ रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला असून पुरवणी परीक्षा जुलै २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. या परिक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (आयटिआयद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) स्विकारण्यात येणार आहेत. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर आवेदन करता येणार असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फतच ही आवेदन पत्रे भरता येणार आहेत. सर्व माध्यमिक शाळांनी ऑनलाईन आवेदन पत्रे भरण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन कार्यवाही करण्याचे निर्देश मंडळाकडून देण्यात आले आहे.

११ जून २०२४ ही आवेदनाची अंतिम तारीख असून विलंब शुल्कासह १२ ते १७ जुन पर्यंत आवेदनपत्र भरता येणार आहे. माध्यमिक शाळांनी १ ते १९ जुन २०२४ दरम्यान बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचे असून माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह २१ जुनपर्यंत विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाच्या आहेत.

Web Title: Apply for the 10th supplementary examination by 11th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.