नवीन झाडे लावा, जगवा तरच तोडण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 09:11 PM2019-05-04T21:11:57+5:302019-05-04T21:13:36+5:30

विकासाच्या नावाखाली शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. याला वेळीच निर्बंध न घातल्यास नागपूर शहराची ‘ग्रीन सिटी’ म्हणून असलेली ओळख भविष्यात पुसली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. विकास तर हवाच पण पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षसंवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत वृक्ष तोडण्याची परवानगी देण्यापूर्वी संबंधित विकासकाने एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावून त्यांचे व्यवस्थित संगोपन करावयाचे आहे. नवीन झाडे मोठी होत असल्याची खात्री पटल्यानंतरच वृक्ष तोडण्याची परवानगी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रक्रि येची कठोर अंमलबजावणी व्हावी, यात पारदर्शकता यावी, यासाठी उद्यान विभागातर्फे ‘ट्री-अ‍ॅप’ लाँच केला जाणार आहे.

Apply new trees and allow them to break apart if they exist | नवीन झाडे लावा, जगवा तरच तोडण्याची परवानगी

नवीन झाडे लावा, जगवा तरच तोडण्याची परवानगी

Next
ठळक मुद्देवृक्षसंवर्धनासाठी मनपाचा ‘ट्री-अ‍ॅप’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विकासाच्या नावाखाली शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. याला वेळीच निर्बंध न घातल्यास नागपूर शहराची ‘ग्रीन सिटी’ म्हणून असलेली ओळख भविष्यात पुसली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. विकास तर हवाच पण पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षसंवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत वृक्ष तोडण्याची परवानगी देण्यापूर्वी संबंधित विकासकाने एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावून त्यांचे व्यवस्थित संगोपन करावयाचे आहे. नवीन झाडे मोठी होत असल्याची खात्री पटल्यानंतरच वृक्ष तोडण्याची परवानगी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रक्रि येची कठोर अंमलबजावणी व्हावी, यात पारदर्शकता यावी, यासाठी उद्यान विभागातर्फे ‘ट्री-अ‍ॅप’ लाँच केला जाणार आहे.
अ‍ॅपच्या माध्यमातूनच झाडे तोडण्यासाठी अर्ज करावा लागेल. अर्जधारकाने नवीन झाडे लावल्यानंतर व तीन महिन्यांची झाल्यानंतर झाडे तोडण्याला परवानगी दिली जाईल. मात्र संबंधित विकासकाला झाडांचे संगोपन करणे बंधनकारक राहील. लावलेली झाडे जिवंत आहेत की नाहीत, याची शहानिशा अ‍ॅपच्या माध्यमातून केली जाईल. दर तीन महिन्यांनी लावलेल्या झाडांचा आढावा घेतला जाईल. परवानगी देण्यापूर्वी अर्जधारकाला कोड क्रमांक दिला जाईल. त्यानुसार पाठविलेल्या माहितीची पडताळणी केली जाणार आहे. झाडांचे व्यवस्थित संगोपन होत असल्याची खात्री पटल्यानंतरच परवानगी दिली जाणार असल्याची माहिती उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
संगोपन न केल्यास नोटीस
परवानगी घेताना विकासकाला लावलेल्या झाडांचे संगोपन करणे बंधनकारक राहील. संगोपन व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विकासकाला नोटीस बजावली जाईल. दर तीन महिन्यांनी लावलेल्या झाडांचे फोटो अ‍ॅपवर डाऊ नलोड करावे लागेल. पाठविलेल्या फोटोनुसार झाडांचे संगोपन होत आहे की नाही, याची उद्यान विभागातर्फे प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.
झाडे न जगल्यास अनामत रक्कम जप्त
झाडे तोडण्याची परवानगी घेताना प्रत्येक झाडासाठी ५,५०० रुपये अनामत रक्कम जमा करावयाची आहे. बांधकामासाठी झाडे तोडण्याशिवाय पर्याय नाही. याची खात्री पटण्यासाठी बांधकाम मंजुरीचा नकाशा सादर करावा लागणार आहे. त्यानंतर झाडे लावून ती तीन महिन्यांची झाल्यानंतर परवानगी दिली जाईल. त्यानंतर झाडांचे संगोपन न केल्यास अनामत रक्कम जप्त केली जाईल.

Web Title: Apply new trees and allow them to break apart if they exist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.