ग्रामसेवकांना नियमित कंत्राटी पद्धत लागू करा
By admin | Published: December 18, 2014 02:52 AM2014-12-18T02:52:37+5:302014-12-18T02:52:37+5:30
ग्राम रोजगार सेवकांना सव्वा दोन टक्के कमिशनवर काम करावे लागत असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत.
नागपूर : ग्राम रोजगार सेवकांना सव्वा दोन टक्के कमिशनवर काम करावे लागत असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. नियमित कंत्राटी पद्धती लागू करावी या मुख्य मागणीला घेऊन ग्राम रोजगार सेवकांनी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात बुधवारी विधानभवनावर धडक दिली. ‘शासकीय सेवेत समाविष्ट करा’, या मजकुराच्या गांधी टोप्या लक्ष वेधून घेत होत्या. मोर्चाच्या शिष्टमंडळाने वित्त व ग्रामविकास मंत्री दीपक केसरकर यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी केसरकर यांनी येत्या पंधरा दिवसांत या प्रश्नांवर बैठक बोलविण्याचे आश्वासन दिले.
नेतृत्व
श्रावण बोकडे, जबाजी अकोलकर, इकोमोद्दीन शेख हनिफ, दिलीप पांचाळ
मागण्या
ग्राम रोजगार सेवकांना नियमित कंत्राटी पद्धत लागू करण्यात यावी.
ग्रामरोजगार सेवकांना नियमित प्रतिमाह मानधन देण्यात यावे.
ग्रामरोजगार सेवकांना श्रेणी-३ लागू करण्यात यावी.
ग्रामरोजगार सेवकांना प्रतिमाह २२ हजार रुपये मानधन देण्यात यावे.
ग्रामरोजगार सेवकांना प्रतिमाह प्रवास भत्ता तीन हजार रुपये देण्यात यावा.