हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी १० जूनपर्यंत अर्ज करा
By आनंद डेकाटे | Updated: April 26, 2024 18:44 IST2024-04-26T18:42:21+5:302024-04-26T18:44:42+5:30
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका या तीन वर्षीय अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची १० जून शेवटची तारीख

Apply till June 10 for Diploma Course in Handloom and Textile Technology
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान बरगढ (ओडिशा) संस्था येथील हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका या तीन वर्षीय अभ्यासक्रमांसाठी १० जूनपर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग आयुक्त अविष्यांत पंडा यांनी दिली.
भारतीय तंत्रविज्ञान संस्था बरगढ (ओडिशा) येथे प्रथम वर्षासाठी महाराष्ट्र राज्यातून १३ जागा, व आर्थिक दृष्या दुर्बल घटकातील एका जागेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच वेंकटगिरी येथे दोन जागेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. द्वितीय वर्षासाठी तीन जागा असून यापैकी एक जागा आर्थिक दुर्बल घटकाचे विद्यार्थ्यांसाठी आहे.
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी विहित नमुन्यातील अर्ज १० जून २०२४ पर्यंत स्विकारण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासंदर्भातील तसेच प्रवेश अर्जाचा नमूना वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जाचा नमूना जूने सचिवालय येथील वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर तसेच विदर्भातील पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रादेशिक उपायुक्त कार्यालय, प्रशासकीय भवन क्रमांक २, आठवा माळा, सिव्हील लाईन, नागपूर येथे उपलब्ध आहे. विदर्भातील पात्र विद्यार्थ्यांनी हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त सीमा पांडे यांनी केले आहे.