सुतिकागृहात रात्र पाळीत डॉक्टर नियुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:09 AM2021-03-01T04:09:21+5:302021-03-01T04:09:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाचपावली सुतिकागृह येथे रात्र पाळीत डॉक्टरची व्यवस्था करा, तसेच् रुग्णांच्या नातेवाइकांसाठी प्रतीक्षा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावली सुतिकागृह येथे रात्र पाळीत डॉक्टरची व्यवस्था करा, तसेच् रुग्णांच्या नातेवाइकांसाठी प्रतीक्षा कक्ष तयार करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी रविवारी दिले. महापाैरांनी पाचपावली सुतिकागृह येथे असलेल्या लसीकरण केंद्राची आणि पाचपावली विलगीकरण केंद्राची आकस्मिक पाहणी केली.
पाचपावली लसीकरण केंद्रात आतापर्यंत तीन हजार आरोग्य सेवक आणि फ्रंट लाईन वर्कर्सना लस देण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. येथे सुतिकागृहात येणाऱ्या गर्भवती महिलांची प्रसूतीसुद्धा केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी डॉ. विजय जोशी, डॉ. दीपांकर भिवगडे यावेळी उपस्थित होते.
पाचपावली विलगीकरण केंद्रावरदररोज १०० नागरिकांची चाचणी केली जाते. येथे सफाई कर्मचारी कमी असल्यामुळे सफाई नियमित होत नसल्याची माहिती दिली. महापौरांनी सहायक आयुक्त गणेश राठोड यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून सफाई कामगारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.