७२ हजार नोकऱ्यांसाठी विदर्भातील बेरोजगारांची नियुक्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 01:50 AM2018-07-12T01:50:18+5:302018-07-12T01:51:02+5:30
महाराष्ट्र शासनाने नोकर भरतीवरील बंदी उठवून पुढील दोन वर्षात ७२ हजार नव्या नेमणुका करण्याची घोषणा केली आहे. शासनाच्या या घोषणेचे स्वागत करून या ७२ हजार जागांवर विदर्भातील बेरोजगारांची नियुक्ती करा यासह इतर मागण्यांसाठी विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने यशवंत स्टेडियम येथून विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र शासनाने नोकर भरतीवरील बंदी उठवून पुढील दोन वर्षात ७२ हजार नव्या नेमणुका करण्याची घोषणा केली आहे. शासनाच्या या घोषणेचे स्वागत करून या ७२ हजार जागांवर विदर्भातील बेरोजगारांची नियुक्ती करा यासह इतर मागण्यांसाठी विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने यशवंत स्टेडियम येथून विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी मॉरिस टी पॉईंट येथे हा मोर्चा अडविला. मोर्चात सहभागी विदर्भ राज्य आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी करून मागण्या रेटून धरल्या. मोर्चातील नेते, कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली. परंतु मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्यामुळे शासनाचा निषेध व्यक्त करून हा मोर्चा मागे घेण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व श्रीहरी अणे, स्वप्नजित संन्याल, श्रीकांत तराळ, अनिल जवादे, वासुदेव विधाते, नीरज खांदेवाले, सुरेंद्र पारधी, शैलेंद्र हारोडे आदींनी केले.
विदर्भातील बेरोजगारांना तीन हजार बेरोजगारी भत्ता द्यावा,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना नोकरी, आरक्षण द्यावे,जाहीर केलेल्या ७२ हजार नोकºया स्थायी स्वरुपाच्या करून त्या विदर्भातील सुशिक्षित बेरोजगारांना द्याव्या,मुनगंटीवार समितीचा अहवाल जाहीर करावा,एमपीएससी मार्फत नोकर भरती करताना विदर्भासाठी वेगळे कॅडर स्थापन करावे, अनुकंपा तत्त्वावर नोकऱ्यांना प्राधान्य द्यावे, प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या द्याव्यात आदी मागण्याही या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.