पोटनिवडणुकीसाठी निरीक्षक व अधिकारी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:09 AM2021-09-27T04:09:03+5:302021-09-27T04:09:03+5:30

चंद्रभान पराते, राजलक्ष्मी शहा, शैलेंद्र मेश्राम यांचाही समावेश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १६ निवडणूक ...

Appointed observers and officers for by-elections | पोटनिवडणुकीसाठी निरीक्षक व अधिकारी नियुक्त

पोटनिवडणुकीसाठी निरीक्षक व अधिकारी नियुक्त

Next

चंद्रभान पराते, राजलक्ष्मी शहा, शैलेंद्र मेश्राम यांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १६ निवडणूक विभाग व पंचायत समितीतील ३१ निर्वाचन गणाच्या पोटनिवडणुका येत्या ५ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी भंडाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांची संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकरिता निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

तसेच नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर व पारशिवनी या तालुक्याकरिता निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून प्रादेशिक चौकशी अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी, शैलेंद्र मेश्राम यांची नियुक्ती केलेली आहे. रामटेक, मौदा, उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्याकरिता निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून उपमहानिरीक्षक (मुद्रांक शुल्क) चंद्रभान पराते यांची नियुक्ती केलेली आहे. कामठी, नागपूर (ग्रामीण), हिंगणा या तालुक्याकरिता निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून उपायुक्त (रोहयो), तथा अपर जिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा यांची नियुक्ती केलेली आहे.

या निवडणुकीसंदर्भात सामान्य नागरिकांना कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी या विनय मुन (भ्रमणध्वनी ९७६३७३८८५५), शैलेंद्र मेश्राम (भ्रमणध्वनी ९४२२८३५५९१), चंद्रभान पराते (भ्रमणध्वनी ९८२२४७२७३५), राजलक्ष्मी शहा (भ्रमणध्वनी ९८९०४५२७४०) निरीक्षकांकडे आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Web Title: Appointed observers and officers for by-elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.