ट्रान्सपोर्ट, टुरिझम आणि कल्चर या सांसदीय समितीवर कृपाल तुमाने यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 08:57 PM2019-09-14T20:57:38+5:302019-09-14T20:59:14+5:30
रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांची संसदेच्या ट्रान्सपोर्ट, टुरिझम आणि कल्चर या समितीवर नियुक्ती करण्यात आलेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांची संसदेच्या ट्रान्सपोर्ट, टुरिझम आणि कल्चर या समितीवर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय महामार्ग, जहाज बांधणी, नागरी उड्डयन, पर्यटन आणि सांस्कृतिक ही पाच मंत्रालय या समिती अंतर्गत येतात. समितीचे मुख्य कार्य हे त्या समिती अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांचा सखोल अभ्यास करून त्याचा सविस्तर अहवाल मंत्रालयाला सादर करणे हे आहे.
ट्रान्सपोर्ट, टुरिझम आणि कल्चर या सांसदीय समितीवर खासदार कृपाल तुमाने यांच्यासोबत अन्य २० लोकसभेच्या खासदारांची नियुक्ती करण्यात आलेली असून १० खासदार राज्यसभेतून या समितीवर नियुक्त करण्यात आलेले आहे.
याअगोदर रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांची संसदेच्या अनुसूचित जाती जनजाती कल्याणार्थ सांसदीय समितीवर नियुक्ती करण्यात आलेली आहे.
यासोबतच खा. डॉ. विकास महात्मे यांची संसदेच्या कोळसा व स्टील समितीवर नियुक्ती करण्यात आली. राकेश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत असेल.