नगरसेवकांच्या रिपोर्ट कार्डनुसार समित्यांवर नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:13 AM2019-06-15T01:13:11+5:302019-06-15T01:13:46+5:30

मनपाच्या विशेष समित्यांमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी भाजपचे नगरसेवक सक्रिय झले आहेत. परंतु या समित्यांमध्ये नियुक्ती करताना नगरसेवकांचे रिपोर्ट कार्डही तपासले जाणार आहे. या नियुक्तीमध्ये लोकसभा निवडणुकीतील कामगिरी आणि आगामी विधानसभा निवडण्ूक याचा प्रभाव सुद्धा स्पष्टपणे राहणार आहे. ज्या नगरसेवकांच्या प्रभागात भाजपला कमी मते मिळाली, त्यांना साईडलाईन करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. असे असले तरी आमदार आपल्या समर्थक नगरसेवकाला पुन्हा समितीत संधी देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एकूण नगरसेवकांच्या रिपोर्ट कार्डवरच त्यांच्या निवडीचे भविष्य अवलंबून आहे.

Appointments to the committees according to the report card of the corporators | नगरसेवकांच्या रिपोर्ट कार्डनुसार समित्यांवर नियुक्ती

नगरसेवकांच्या रिपोर्ट कार्डनुसार समित्यांवर नियुक्ती

Next
ठळक मुद्देभाजप नगरसेवक सक्रिय : समितीत जागा मिळवण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मनपाच्या विशेष समित्यांमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी भाजपचे नगरसेवक सक्रिय झले आहेत. परंतु या समित्यांमध्ये नियुक्ती करताना नगरसेवकांचे रिपोर्ट कार्डही तपासले जाणार आहे. या नियुक्तीमध्ये लोकसभा निवडणुकीतील कामगिरी आणि आगामी विधानसभा निवडण्ूक याचा प्रभाव सुद्धा स्पष्टपणे राहणार आहे. ज्या नगरसेवकांच्या प्रभागात भाजपला कमी मते मिळाली, त्यांना साईडलाईन करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. असे असले तरी आमदार आपल्या समर्थक नगरसेवकाला पुन्हा समितीत संधी देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एकूण नगरसेवकांच्या रिपोर्ट कार्डवरच त्यांच्या निवडीचे भविष्य अवलंबून आहे.
येत्या २० जून रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत दहा विशेष समित्यांच्या सदस्यांची आणि सभापतींच्या नावांची घोषणा करण्यात येईल. यामध्ये स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती, वैद्यकीय व सेवा समिती, विधि व सामान्य समिती, शिक्षण समिती, स्लम निर्मूलन व गृहनिर्माण समिती, क्रीडा समिती, महिला व बालकल्याण समिती, जलप्रदाय समिती, कर संकलन समिती आणि अग्निशमन व विद्युत समितीचा समावेश आहे.
समितींच्या कामाचा आढावा घेतला तर सर्वात खाली अग्निशमन व विद्युत समिती, स्लम निर्मूलन व गृहनिर्माण समिती, शिक्षण समिती राहिली आहे. अग्निशमन विभागात सातत्याने कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त होत आहे. येथे १५० पेक्षाही कमी लोक उरले आहेत. त्रिमूर्तीनगर फायर स्टेशन बनून तयार आहे. परंतु त्याचे लोकार्पण सुद्धा झालेले नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते याचे लोकार्पण होणार होते. परंतु आॅक्युपेंसी सर्टिफिकेट सुद्धा घेता आले नाही. मनुष्यबळाचीही कमतरता आहे. समितीचे सभापती लहुकुमार बेहते एखादवेळेसच बैठक घेतात. परंतु त्यांच्या उपस्थितीचा परिणामही दिसून येत नाही. त्याचप्रकारे स्लम निर्मूलन आणि गृहनिर्माण समितीच्याही ठराविकच बैठका झाल्या. गृहनिर्माणाला प्रोत्साहन देण्यासाठी कुठलेही प्रभावी पाऊल उचलण्यात आलेले नाही. शिक्षण समितीसुद्धा अपयशी ठरली आहे. दहावी व बारावीचे निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप घसरले आहे. तसेच मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची संख्याही कमी होत आहे. अभियान तर खूप चालवण्यात आले परंतु ते अपयशी ठरले.


परिवहनचे सहा सदस्य होणार घोषित
परिवहन समितीतून सेवानिवृत्त झालेले १२ पैकी ६ सदस्यांच्या नावाची घोषणाही बैठकीत होईल. यात भाजपचे ५ आणि बसपाचा एक सदस्य राहील. परिवहन समितीबाबत नगरसेवकांना आकर्षण हेते, परंतु सध्या परिवहन समिती तोट्यात चालत आहे. त्यामुळे या समितीलाही रुळावर आणणे मोठे आव्हान आहे.

 

Web Title: Appointments to the committees according to the report card of the corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.