१.२१ काेटीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:07 AM2021-03-20T04:07:29+5:302021-03-20T04:07:29+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : पालिकेच्या सभागृहात शुक्रवारी (दि. १९) आयाेजित विशेष बैठकीमध्ये पालिकेच्या सन २०२१-२२ च्या अंदाजपत्रकाला मंजुरी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पालिकेच्या सभागृहात शुक्रवारी (दि. १९) आयाेजित विशेष बैठकीमध्ये पालिकेच्या सन २०२१-२२ च्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. या अंदाजपत्रकात १२२ काेटी ५४ लाख ६५ हजार रुपयांची महसुली व भांडवली जमा तर १२२ काेटी ३३ लाख ३५ हजार रुपयांचा महसूल व भांडवली खर्च दाखवण्यात आल्याने हे अंदाजपत्रक २१ लाख ३० हजार रुपयांनी शिलकीचे आहे.
पालिकेचे लेखापाल अमित खंडेलवाल यांनी सभागृहात सन २०२१-२२ चे १ काेटी २१ लाख ३० हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. यात पालिकेचे महसुली व भांडवली उत्पन्न १२२ काेटी ५४ लाख ६५ हजार रुपये दाखवण्यात आले असून, १२२ काेटी ३३ लाख ३५ हजार रुपयांचा महसूल व भांडवली खर्च दाखवण्यात आला आहे. या शिलकीच्या अंदाजपत्रकाला सभागृहात सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली.
यात महसुली कर आणि भरपाई, महसुली अनुदाने, नगर परिषद मालमत्तेपासूपासून मिळणारे उत्पन्न, फी व दंड आकार, वैशिष्ट्य प्रयोजनासाठी अनुदाने, आस्थापना व खर्च, प्रशासकीय खर्च, मालमत्तेची दुरुस्ती व परीक्षण, राखीव निधी, संकीर्ण, खर्च, भांडवली खर्च, स्थिर व जंगम मालमत्ता व प्रगतिपथावरील भांडवली कामे यासह अन्य महत्त्वाच्या बाबींसाठी तरतूद करण्यात आली आहे.
या तरतुदीनुसार यावर्षी पालिकेची महसुली जमा (उत्पन्न) ३४ कोटी ३१ लाख ६५ हजार रुपये तर भांडवली जमा ८८ कोटी २३ लाख रुपये असे एकूण १२२ कोटी ५४ लाख ६५ हजार रुपये दाखवण्यात आली आहे. यातून महसुली खर्च हा ३३ कोटी ५३ लाख ९५ हजार रुपये तर भांडवली खर्च ८७ काेटी ८० लाख रुपये असा एकूण १२१ काेटी ३३ लाख ३५ हजार रुपये होणार असल्याचे अपेक्षित आहे. नगराध्यक्ष मोहम्मद शहाजहा शफाहत अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला पालिकेचे लेखापाल अमित खंडेलवाल, धर्मेश जयस्वाल, अश्विनी पिल्लारे यांच्यासह सर्व पदाधिकारी व २६ नगरसेवकांची उपस्थिती हाेती.