मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची १३८ रिक्त पदे भरण्यास मान्यता, चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 05:47 PM2023-12-18T17:47:57+5:302023-12-18T17:48:16+5:30

यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रा. वर्षा गायकवाड यांनी भाग घेतला.

Approval to fill 138 vacant posts of professors in Mumbai University, information of Chandrakant Patil in the Legislative Assembly | मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची १३८ रिक्त पदे भरण्यास मान्यता, चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत माहिती

मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची १३८ रिक्त पदे भरण्यास मान्यता, चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत माहिती

नागपूर : मुंबई विद्यापीठात रिक्त पदांवर मनुष्यबळ भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांची १३८ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रा. वर्षा गायकवाड यांनी भाग घेतला.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील म्हणाले की, मुंबई विद्यापीठातील दूरस्थ शिक्षण (डिस्टन्स एज्युकेशन) पद्धतीद्वारे शिक्षण पदव्युत्तर अभ्यासक्रमातील ४५६ विद्यार्थ्यांच्या निकालास विलंब झाला असून सद्य:स्थितीत हे निकाल लागले आहे. प्राध्यापकांची संख्या कमी असल्यामुळे निकाल उशिराने लागले. मुंबई विद्यापीठात कुलगुरू प्रभारी नाहीत. ते पूर्णवेळ आहेत. सन २०१७-१८ मध्ये विद्यापीठात नवीन परीक्षा निकाल पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ही पद्धत लागू करण्यास अडथळे निर्माण झाले. 

या अडचणीतून विद्यापीठ आता बाहेर पडत आहे. मुंबई विद्यापीठात ६ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठ विविध अभ्यासक्रमांच्या एकूण ३७२ परीक्षा घेते. पदव्युत्तर दूरस्थ: शिक्षण अभ्यासक्रमाचे निकाल वगळता सर्व निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्यात आले आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

Web Title: Approval to fill 138 vacant posts of professors in Mumbai University, information of Chandrakant Patil in the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.