दीड वर्षापासून उभ्या विमानाचे ‘एआरसी’ संपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:09 AM2021-09-24T04:09:50+5:302021-09-24T04:09:50+5:30
नागपूर : मिहान येथील एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या (एआयईएसएल) एमआरओ परिसरात गत दीड वर्षापासून एअर इंडियाचे बोईंग-७७७ विमान दुरुस्तीच्या ...
नागपूर : मिहान येथील एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या (एआयईएसएल) एमआरओ परिसरात गत दीड वर्षापासून एअर इंडियाचे बोईंग-७७७ विमान दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. विमान दीड वर्षापासून उभे असल्यामुळे विमानाच्या ‘एअरवर्दीनेस’ प्रमाणपत्राची (एआरसी) वैधता संपली आहे. आता नव्या प्रक्रियेने त्याचे एआरसी करावे लागणार आहे.
एकीकडे एअर इंडियाच्या विमान सेवेसाठी बोली लागत आहे, तर दुसरीकडे एअरलाईन्स विमानाची देखभाल आणि दुरुस्तीची आवश्यकता वाढली आहे. गेल्यावर्षी दोन व्हीव्हीआयपी विमानांच्या दुरुस्तीसाठी बोईंग कंपनीकडून घेतलेल्या दोन नवीन विमानातून काढण्यात आलेल्या सुट्या भागाची आता जुन्या विमानालाही प्रतीक्षा आहे. प्रतीक्षेच्या काळात याच जुन्या विमानातून सुटे भाग काढून एअर इंडियाच्या अन्य विमानांची दुरुस्ती करण्यात आली आहे. एमआरओच्या हँगरबाहेर उभ्या असलेल्या या विमानाचे इंटेरिअर बदलण्यात येणार आहे, याशिवाय काही आवश्यक सुटे भागही लावण्यात येणार आहे. संपूर्ण दुरुस्तीनंतरच एमआरओ या विमानाच्या एआरसी निरीक्षणासाठी डीजीसीएच्या चमूला बोलवू शकते. विमान केव्हा उडू शकेल, यावर एमआरओ व्यवस्थापन स्पष्ट करण्याच्या स्थितीत नाही. नागपुरात येण्यापूर्वी हे विमान दिल्लीहून शिकागो आणि सॅनफ्रान्सिस्कोकरिता उड्डाण घेत होते.