नागपूरचे आर्चबिशप अब्राहम विरूथकुलंगारा यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:28 PM2018-04-19T23:28:24+5:302018-04-19T23:28:34+5:30
नागपूरचे रेव्हरंड आर्चबिशप अब्राहम विरुथकुलंगारा यांचे गुरुवारी दिल्ली येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर २३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येतील. ते सीबीसीआय सेंटर दिल्ली येथे आयोजित हिंदी बोलणाऱ्या बिशपांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांचे पार्थिव दिल्लीवरून विमानाने रात्री उशिरा नागपूरला आणण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरचे रेव्हरंड आर्चबिशप अब्राहम विरुथकुलंगारा यांचे गुरुवारी दिल्ली येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर २३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येतील. ते सीबीसीआय सेंटर दिल्ली येथे आयोजित हिंदी बोलणाऱ्या बिशपांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांचे पार्थिव दिल्लीवरून विमानाने रात्री उशिरा नागपूरला आणण्यात आले.
१९७७ मध्ये मध्य प्रदेशातील खंडवा येथे बिशप म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे वय केवळ ३४ वर्षांचे होते. त्यांचा जन्म ५ जून १९४३ रोजी केरळमध्ये झाला. १९६० मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मध्य प्रदेशातील इंदूर येथे त्यांनी सेमिनरी जॉईन केली होती. २८ आॅक्टोबर १९६९ मध्ये त्यांना ‘प्रीस्ट’ घोषित करण्यात आले. यानंतर त्यांनी नागपुरातील सेंट चार्ल्स सेमिनरीमधून पुरोहितचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर तब्बल आठ वर्ष त्यांनी गोंड आदिवासींमध्ये समन्वयाचे कार्य केले. त्यांचे कार्य आणि समर्पणामुळे पोप यांनी त्यांच्यावर खंडवा येथील आदिवासी क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी सोपविली. संत मदर टेरेसा यांनी त्यांचे कौतुक करताना म्हटले होते की, ‘युवा आणि ऊर्जावान असलेल्या या प्रधान पादरीने आपल्या भाषेच्या प्राविण्याने हजारो लोकांचे जीवन बदलविले आहे’. तब्बल २१ वर्षे त्यांनी खंडवा येथे घालविले. यानंतर २२ एप्रिल १९८८ रोजी त्यांना नागपूरचे आर्चबिशप म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यांनी नागपूरला आपले मिशन ‘आर्किडियोसीस’ सुरू केले. ते कॅथोलिक बिशप युवा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. ते वेस्टर्न रिजन बिशपचे चेअरमनही राहिले आहेत.
त्यांचे निधन एक मोठी क्षती
नागपूरचे आर्चबिशप रेव्हरंड अब्राहम विरुथकुलंगारा यांचे निधन मोठी क्षती आहे. ते आपल्या सिद्धांताचे पक्के होते. त्यांनी मध्य भारतातील मोठ्या समुदायासाठी धार्मिक विचारांचे नेतृत्व केले.
बनवारीलाल पुरोहित
राज्यपाल, तामिळनाडू