ऑनलाईन क्लासेस, मीटिंग्ज खरेच सुरक्षित आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 09:44 AM2020-05-21T09:44:08+5:302020-05-21T09:44:29+5:30

ऑनलाईन क्लासेस व मिटिंग्ज खरेच सुरक्षित आहेत का, हा सवाल उपस्थित होणे महत्त्वाचे ठरते. यासाठी पालकांनी काळजी घेण्याशिवाय पर्याय नाही.

Are Online Classes, Meetings Really Safe? | ऑनलाईन क्लासेस, मीटिंग्ज खरेच सुरक्षित आहेत?

ऑनलाईन क्लासेस, मीटिंग्ज खरेच सुरक्षित आहेत?

Next
ठळक मुद्दे: पालक, प्रोफेशनल्सनी काळजी घेणे गरजेचे

सैयद मोबीन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९चे संक्रमण रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून देशभरात टाळेबंदी आहे. अशा स्थितीत अनेक कंपन्यांनी व शाळांनी ऑनलाईन मीटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून आपली नियमित कामे करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. परंतु, ऑनलाईन क्लासेस व मिटिंग्ज खरेच सुरक्षित आहेत का, हा सवाल उपस्थित होणे महत्त्वाचे ठरते. यासाठी पालकांनी काळजी घेण्याशिवाय पर्याय नाही.
ऑनलाईन मिटिंग्ज म्हणा व क्लासेस घेताना संबंधितांना यात सहभागी होण्यासाठी लिंक फॉरवर्ड केली जाते. ही लिंक चुकीने दुसऱ्याच व्यक्तीपर्यंत पोहोचली तर तोही यात सहभागी होतो आणि वाममार्गाचा वापर करण्याची शक्यता असते. अशा बऱ्याच घटना पुढे आल्या आहेत. म्हणूनच ऑनलाईन क्लासेसच्या वेळी पालकांनी मुलांसोबत हजर असणे गरजेचे ठरते. यासोबतच प्रोफेशनल्स पर्सन्सनेही अशा लिंक फॉरवर्ड करताना सजग राहणे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे, ऑनलाईन मीटिंग अ‍ॅपमध्ये सर्वच सहभागींना एकसाथ बघणे शक्य नाही. यासाठी स्क्रोल करत राहावे लागते. त्यामुळे मीटिंगमध्ये क्लासमध्ये कोण सहभागी आहे आणि जो सहभागी आहे तो संबंधितच आहे की नाही, याची निश्चिती नसते. म्हणूनच लिंक फॉरवर्ड करताना काळजी घेणे हाच एकमेव उपाय आहे.

क्लास पूर्ण होताच मोबाईल करा दूर!
ऑनलाईन क्लासच्या वेळी मुलांसोबत पालकांनी हजर असावे व क्लास आटोपताच मोबाईलपासून मुलांना दूर करावे. त्यामुळे, मुले क्लास वगळता मोबाईलचा वापर करणार नाहीत आणि मुलांना मोबाईल अ‍ॅडिक्ट होण्यापासून वाचवता येईल.

संवेदनाहीन होण्याची भीती
सायबर विशेषज्ञांच्या मते, लोक ऑनलाईन मीटिंग अ‍ॅपवरूनच संवाद साधायला लागतील तर प्रत्यक्ष भेटण्याचा काळ समाप्त होईल. त्यामुळे, एकमेकांच्या भावनांचे आदानप्रदान बंद होईल. प्रत्येकच जण ऑनलाईनलाच प्राधान्य देईल. म्हणून या व्यवस्थेचा उपयोग केवळ लॉकडाऊनमध्ये करण्याची भूमिकाच रास्त राहील.

Web Title: Are Online Classes, Meetings Really Safe?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onlineऑनलाइन